Motha Waghoda

मोठा वाघोदा येथील डि.के. महाजन यांना विशेष दातृत्व सन्मान २०१९ पुरस्कार प्रदान

मोठा वाघोदा येथील डि.के. महाजन यांना विशेष दातृत्व सन्मान २०१९ पुरस्कार प्रदान

प्रतिनिधी / मोठे वाघोदे ता. रावेर मुबारक तडवी

मोठा वाघोदा तालुका रावेर येथील प्रगतिशील शेतकरी तथा चक्रधर शिक्षण मंडळाचे चेअरमन श्री.डि.के महाजन यांना श्रीकृष्ण सांस्कृतिक गोफ मंडळातर्फे दिला जाणारा दिला जाणारा *विशेष दातृत्व सन्मान २०१९ या पुरस्काराने गौरविण्यात आले* मोठा वाघरा येथील भागवत कथा सप्ताह सोहळा दरम्यान प्रदान करण्यात आला असून, ह.भ.प.समाधानजी महाराज (भोजेकर) जळगाव यांच्या हस्ते भागवत कथा सप्ताह ठिकाणी महाजन यांचे सुपुत्र वाघोदा फुट कंपनीचे संचालक श्री.प्रफुल्ल महाजन यांचा सत्कार व पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यात आर्थिक असे अमूल्य योगदान तसेच केलेल्या दानाचा प्रचार व प्रसार न करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराचे हे प्रथमच वर्ष असून या पुरस्काराचा पहिला मान येथील प्रगतशील शेतकरी डि के महाजन यांना प्रदान करण्यात आला त्यांना प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व समाजातून बांधवांकडून त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button