?️अमळनेर कट्टा… अमळनेर रा.मा.15 चे काम सुरू होते त्यामूळे शहरातून जाणारा रा.मा 06 (प्रबुद्ध विहार ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुला पर्यंत) रस्त्यावरून सर्व अवजड वाहतूक वळविल्याने रा.मा 06 ची संपुर्ण झाली चाळण..
अमळनेर रा.मा.15 चे काम सुरू होते त्यामूळे शहरातून जाणारा रा.मा 06 (प्रबुद्ध विहार ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुला पर्यंत) रस्त्यावरून सर्व अवजड वाहतूक वळविल्याने रा.मा 06 ची संपुर्ण चाळण झाली आहे.विशेष करून सुभाष चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूल पर्यँत धुळीचे वातावरण होऊन प्रदूषण होत आहे. त्यामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रासाचा तक्रारीत वाढ झाल्याचे समजते.त्यास अनुसरून तरुण मित्र परिवाराने दि.१/१२/२०२० रोजी मा.कार्यकारी अभियंता सार्व.बांधकाम विभाग व मुख्याधिकारी अमळनेर नगरपरिषद यांना निवेदन देऊन तात्काळ दुरुस्तीची मागणी केली होती. प्रशासनाने कुठलीही दखल न घेतल्याने दि.०४/१२/२०२० रोजी तरुण मित्र परिवार रास्ता रोको करणार असल्याचे जाहीर केले होते. शहरात एकमेव रस्ता सुरू असल्याने रस्ता रोको केल्यास मोठी गैरसोय होईल व परिस्थिती चे गांभीर्य लक्षात घेत मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राकेश जाधव साहेब व मा पोलीस निरीक्षक श्री आंबदासजी मोरे साहेब यांनी तूर्त आंदोलन करू नये म्हणून मध्यस्ती करत नगरपरिषदेस योग्य मार्ग काढण्यासाठी आव्हान केले होते त्याअनुषंगाने आमच्या सोबत मुख्यधिकारी सौ.विद्या गायकवाड यांनी चर्चा करून येत्या ०४ दिवसात सदर रस्त्याची पाहणी करून डागडुजी करण्याचे आश्वासन दिले होते .तरी दि.१०/०१/२०२० रोजी पर्यंत कुठलीही प्रगती न झाल्याने व आम्हाला दिलेल्या आश्वसनाची पुर्तता न केल्याने दि 11/01/2021 रोजी आम्ही प्रशासनाचा निषेध व्यक्त करत पुनश्च निवेदन दिले होते त्या वेळेस मा. आमदार साहेबराव दादा पाटील व मुख्याधिकारी सौ.गायकवाड व विरोधी पक्ष गटनेते प्रवीण पाठक यांचा सोबत चर्चा करून 8 दिवसात काम पूर्ण केलं जाईल अस आश्वासन दिले होते.आज पावेतो कामात कुठलीही प्रगती नाही.
तरी आता आमचा प्रशासनाचा खोट्या आश्वासनावर विश्वास राहिला नाही त्यामुळे दि 11/02/2021रोजी आम्ही जलसंपदा मंत्री अमळनेर मध्ये येणार आहेत त्यांना आम्ही नवीन तयार झालेल्या रामा 15 वरून फिरू देणार नाही.याची प्रशासनाने नोंद घ्यावी असे निवेदन आज मा. जिल्हा नियोजन समिती सदस्य पंकज चौधरी, नगरपरिषद विरोधी पक्ष नेते प्रविणभाऊ पाठक, संतोषभाऊ लोहेरे, बाळासाहेब संदानशिव,पराग चौधरी आदींचा सहीचे निवेदन आज प्रांताधिकारी सौ सीमा अहिरे यांना आज देण्यात आले.






