sawada

ताप्ती सातपुडा जर्नलिस्ट असोसिएशन तर्फे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन चांगली घटना व दुःखद घटना घडली तरी पोलिस पत्रकार सोबतच असतात सपोनी जालिंदर पळे

ताप्ती सातपुडा जर्नलिस्ट असोसिएशन तर्फे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
चांगली घटना व दुःखद घटना घडली तरी पोलिस पत्रकार सोबतच असतात सपोनी जालिंदर पळे
————————————-

सावदा प्रतिनिधी:- युसूफ शाह.

मराठी पत्रकार दिनानिमित्त काल दि.०६ रोजी खान्देश ताप्ती सातपुडा जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीने मस्कावद रोडवरील मरीमाता मंदिराच्या हॉलमध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाही मराठी पत्रकारितेचे आचार्य बाळशास्त्री जाभेकर यांना अभिवादन करण्यासाठी व शहरातील पत्रकार बांधवांचा सन्मान साठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामदेवता मरीआई ,शनेश्वर भगवान याच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले व नंतर मराठी पत्रकारितेचे पितामह आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व फुल हार अर्पण सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, प्रमुख अतिथी साहित्यिक कथाकथनकार प्रा.व. पु. होले ,पालिकेचे कर निरीक्षक अनिल आहुजा,अरुण ठोसरे, चिनावल येथील नूतन माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष श्रीकांत सरोदे , जिल्हा दूध संघाचे संचालक ठकसेन पाटील चिनावल, शिवसेना उपतालुकाप्रमुख धनंजय चौधरी सावदा , शहर प्रमुख भरत नेहते, ताप्ती सातपुडा जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्याम पाटील, उपाध्यक्ष प्रवीण पाटील, सचिव अनुमदर्शी तायडे यांनी केले, व्यासपीठावर उपस्थित होते .
पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावर बोलताना सांगितले की पत्रकार हा समाजाचा खरा आधारस्तंभ आहे. सुखदुःखाची बातमी समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम पत्रकारांमार्फतच होत असते आमचे तर ते सुखदुःखात प्रत्येक घटनेचे सोबती असतात असे यांनी सांगितले.
होले सर म्हणाले की, पत्रकारांना त्यांचे कर्तव्य पार पाडण्यासाठी सुख दुःख विसरून कार्य करावे लागते. कशाही बिकट परिस्थितीत व चांगल्या परिस्थितीत त्यांना पत्रकारिता करावे लागते हे त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. अशा परिस्थितीतही ते आपल्यापर्यंत सामाजिक बातम्या व दुःखद,सुखद घटना पोहोचवण्याचे कार्य करीत असतात असे प्रतिपादन साहित्यिक व होले यांनी केले.
चिनावल येथील श्रीकांत सरोदे,ठकसेन पाटील , सुनील फालक यांनी उपस्थित सर्व पत्रकारांना लेखणी म्हणून उत्कृष्ट असा पेन व गुलाब देऊन स्वागत केले .यावेळी श्याम पाटील, प्रवीण पाटील, अनोमदर्शी तायडे, राजीव दिपके, साजिद शेख, पंकज पाटील, कमलाकर पाटील, राजू भारंबे, मिलिंद टोके, मिलिंद कोरे, पिंटू कुलकर्णी,फरीद शेख,युसूफ शाह,दिलीप चांदेलकर, संजय चौधरी,रोशन वाघूळदे,प्रशांत भारंबे,सायली महाजन,पाटील उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button