Mumbai

?मोठी बातमी..!शिवसेनेच्या संजय राऊत यांच्या विरोधात महिलेने केले गंभीर आरोप..!उच्च न्यायालयात घेतली धाव..!

?मोठी बातमी..!शिवसेनेच्या संजय राऊत यांच्या विरोधात महिलेने केले गंभीर आरोप..!उच्च न्यायालयात घेतली धाव..!

मुंबई : धनंजय मुंडे, संजय राठोड यांच्यापाठोपाठ आता थेट शिवसेनेची तोफ आणि संकटमोचक समजले जाणारे संजय राऊत यांच्यावर एका महिलेने आरोप केले आहेत. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात आली आहे.

गेल्या सहा ते सात वर्षापासून संजय राऊत हे आपला छळ करत असल्याचे महिलेने न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत नमुद केले आहे. याशिवाय राऊत यांनी आपल्या पाळतीवर माणसे लावण्यासह हेरगिरी करणे असे विविध आरोप या महिलेने केले आहे. राऊत यांनी आपले राजकीय वजन वापरल्यामुळे त्यांच्यावर पोलिस कारवाई झाली नसल्याचे देखील याचिकेत म्हटले आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल असलेल्या दोन रिट याचिकांपैकी पहिली सुनावणी 4 मार्च रोजी होईल. न्या. संभाजी शिंदे व न्या.मनिष पितळे यांच्या खंडपीठात अ‍ॅड. आभा सिंह यांनी हा अर्ज दाखल केला आहे.
सन २०१३मध्ये माझ्या रेस्टॉरंटबाहेर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी माझ्यावर केलेल्या हल्ल्याविषयी माहिम पोलिस ठाण्यात आणि सन २०१८मध्ये माझ्या कारवर झालेल्या हल्ल्याबाबत वाकोला पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवला होता; मात्र, पोलिसांकडून याबाबत कोणतीही कारवाई झाली नाही. त्यांनी संजय राऊत यांचा साधा जबाबही नोंदवला नाही,’ असे या महिलेने याचिकेत म्हटले आहे.
मागील सात वर्षांपासून सुरू असलेल्या या छळवणुकीविषयी गेल्या वर्षी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून दाद मागितली. मात्र, काही उपयोग झाला नाही. त्यामुळे मी राष्ट्रीय महिला आयोगाकडे धाव घेतली. अखेर आयोगाने एफआयआर नोंदवून कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र, तरीही बीकेसी-परिमंडळ ८च्या पोलिस उपायुक्तांनी त्याची आजतागायत दखल घेतली नाही. म्हणून नाईलाजास्तव उच्च न्यायालयात दाद मागावी लागत आहे,’ अशी कैफियतही या महिलेने याचिकेत मांडली आहे. या संदर्भात प्रतिक्रियेसाठी संजय राऊत यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न करूनही ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button