लग्न व इतर समारंभावर कडक लक्ष देण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश
गणेश ढेंबरे / औरंगाबाद
जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असून नागरिकांनी तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका रोखण्याच्या दृष्टीने कोवीड नियमावलीचे कटाक्षाने पालन करणे बंधनकारक आहे. त्याची प्रभावी अमंलबजावणी होण्यासाठी यंत्रणांनी सर्तक राहण्याचे व शहरात पार पडणाऱ्या लग्न व इतर समारंभावर कडक लक्ष ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत कोवीड उपाय योजना आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना निर्देशित केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकरी डॉ.मंगेश गोंदावले, यांच्यासाह सर्व संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात निर्बंधासह सर्व व्यवहार चालू ठेवले असून त्यामध्ये नागरिकांनी, सर्व व्यापारी, आस्थापना, व्यावसासिकांनी कोवीड नियमावलीचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर उपविभागीय अधिकारी, वॉर्ड अधिकारी यांनी दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश सुनील चव्हाण यांनी दिले.






