Pune

शिनोली विद्यालयाची 100 टक्के निकालाची परंपरा कायम

शिनोली विद्यालयाची 100 टक्के निकालाची परंपरा कायम

पुणे प्रतिनीधी – दिलीप आंबवणे

आदिवासी भागातील रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागातील भिमाशंकर विद्यामंदिर व श्री.टी. एस.बोराडे कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय शिनोली विद्यालयाने १०० टक्के निकालाची परंपरा सन २०१९-२० याही वर्षात कायम ठेवली आहे. विद्यालयाचा फेब्रुवारी २०१९-२० घेण्यात आलेल्या एच.एस.सी.परीक्षेचा विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला.

त्याचप्रमाणे कला शाखेचा निकाल 99.14 टक्के लागला आहे. मार्च 2019-20 मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी. परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला. प्रथम क्रमांक-कु.संजना विलास कोळप-94.80 टक्के ,द्वितीय क्रमांक-कु.तृप्ती संतोष सरोदे-94.20 टक्के, तृतीत क्रमांक कु.तृप्ती भारत बोऱ्हाडे-93.40 टक्के यांनी पटकावला.

विद्यालयाची गुणवत्ता पाहता एकूण 86 विद्यार्थ्यांपैकी 7 विद्यार्थी 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले.25 विद्यार्थी 80 टक्के पेक्षा जास्त गुण व 23 विद्यार्थी 70 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थी, शिक्षक,पर्यवेक्षक, व प्राचार्य यांचे विद्यालयातील स्कूल कमिटी, पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, सरपंच,उपसरपंच,तसेच शिनोलीतील विविध संस्थांनी अभिनंदन केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button