Amalner

बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपिक प्रकाश वाघ यांचा सेवापुर्ती निमित्ताने सन्मान

बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपिक प्रकाश वाघ यांचा सेवापुर्ती निमित्ताने सन्मान

अमळनेर प्रतिनिधी- सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपिक व पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे चिटणीस प्रकाश रामदास वाघ यांचा सेवापुर्ती निमित्ताने पुज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे संचालक ईश्वर महाजन यांंनी त्यांचा सन्मान पत्र शाल व बुके देऊन सत्कार केला.यावेळी सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे पत्रकार संजय पाटील ,जितेंद्र ठाकूर ,महेंद्र रामोशी उपस्थित होते. बांधकाम विभागातील कार्यक्षम वरिष्ठ लिपिक प्रकाश वाघ यांनी एकोणचाळीस वर्षे सेवा केली सेवा करत असताना सामाजिक बांधिलकी जोपासली. शासनाचे उद्दिष्ट साध्य केले त्यांच्या कामाची दखल शासनाने घेतली व त्यांना शासनाच्या वतीने गुणवंत कर्मचारी पुरस्कार माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते देण्यात आला होता. त्यांच्या सेवापूर्ती निमित्ताने त्यांच्या बांधकाम विभागातील वरिष्ठ अभियंता सर्व पदाधिकारी,नातेवाईक, समाज बांधव व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सेवापुर्ती निमित्ताने त्यांचा सत्कार बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचारी समाज बांधव मित्रपरिवार व नातेवाईक यांनी केला. त्यांच्याबद्दल गौरवोद्गार व आपल्या भावना मुलगी ,सून ,मुलगा निलेश यांनी व्यक्त केले.
अनेक मान्यवरांनी त्यांच्या कामाची पावती आपल्या मनोगतातून व्यक्त केली सत्काराला उत्तर देताना सत्कार मूर्ती प्रकाश वाघ म्हणाले की आतापर्यंत केलेल्या कामाची पावती म्हणून सर्व स्तरातून माझ्यावर प्रेम करणारे बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याच्यासारखा मोठा आनंद नाही. बांधकाम क्षेत्रात काम करत असताना मी कधीही नकारात्मक विचार केला नाही माझ्याजवळ आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं काम झाले पाहिजे हे माझे उद्दिष्ट असायचे ते मी पूर्ण केल्याचे मला समाधान आहे.असे सांगितले.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी केले.
यावेळी बांधकाम विभागाचे अभियंता राजपूत व अनेक अधिकारी उपस्थित होते,आमदार अनिल पाटील,
ग.स.सोसायटीचे उपाध्यक्ष श्यामकांतजी भदाणे,सानेगुरुजी स्पर्धा परीक्षा संचालक विजयसिंग पवार,सानेगुरुजी वाचनालयाचे संचालक मंडळ उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button