Pune

स्वामी विवेकानंद प्रतिष्ठाणचे पुरस्कार जाहिर.. श्रीमंत भुषणसिंह राजे होळकर यांची प्रमुख उपस्थितीत रंगणार पुरस्कार वितरण सोहळा

स्वामी विवेकानंद प्रतिष्ठाणचे पुरस्कार जाहिर..

श्रीमंत भुषणसिंह राजे होळकर यांची प्रमुख उपस्थितीत रंगणार पुरस्कार वितरण सोहळा

पुणे जिल्हा प्रतिनिधि दत्ता पारेकर

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय प्रतिष्ठाणच्यावतीने व्याख्यान व पुरस्कार वितरण सोहळा रविवार दी.16 फेब्रूवारी रोजी शहरातील श्री शिवाजी महाविद्यालय सांस्कृतिक सभागृह येथे सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे.यावेळी राजमाता अहिल्यामाता होळकर (इंदौर) यांचे वंशज श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर, मराठवाडा विभाग शिक्षक आ.विक्रम काळे आदिंची उपस्थिती राहणार आहे. जाहिर झालेले पुरस्कार यामध्ये राज्यस्तरीय जिजाऊ गौरव पुरस्कार – जि.प. अध्यक्षा निर्मलाताई उत्तमराव विटेकर, कस्तूरबाबाई शेषरावजी भरोसे , शितल किरण सोनटक्के (ज्ञानसाधना प्रतिष्ठाण संचालिका) , जीवन गौरव पुरस्कार – केशव अण्णा दुधाटे, निवृत्ती रेखडगेवाड , महाराष्ट्र भूषण पुरस्कार – प्राचार्य डॉ. बी.यू.जाधव, इंजि. आर. डी. मगर, प्रा.टी.जी.सूर्यवंशी , समाजभूषण पुरस्कार – डॉ. मारोती हुलसुरे, प्राचार्य प्रकाश हरगावकर, डॉ.प्रभाकर टेकाळे, प्रा.डॉ. भीमराव खाडे , राज्यस्तरीय क्रीडारत्न – गोपाळराव मोरे , साहित्यिक रत्न – राजेंद्र गहाळ, वैद्यकीय रत्न- डॉ. मंजूषा नरवाडकर तर आदर्श शिक्षक म्हणून शिवाजी वाघमारे (भारतीय बालविद्यामंदिर परभणी), सुभाष ढगे (बालविद्यामंदिर), मंजूषा पवार (कस्तूरबा गांधी बालिका विद्यालय), श्यामसुंदर गाडेकर(जि.प.प्रा.शाळा पिंगळी), भीमराव काकडे ( माध्य. व उच्च माध्य.विद्यालय देवनांद्रा पाथरी), सदाशिव होगे (नेताजी सुभाष विद्यालय मानवत), सेवा सटवाजी ढोणे(कै. मुंजाजी विठ्ठलराव शिंदे विद्यामंदिर परभणी ), प्रा.डॉ.शेख राजू शहाबुद्दीन( गुरूबुद्धी स्वामी महाविद्यालय पूर्णा), दिगांबर दुधाटे (जय क्रांती हायस्कूल फरकंडा ता.पालम), रामकिशन भोसले( जि. प.प्रा. शाळा टाकळगव्हाण पाथरी),कल्पना राजेंद्र शुक्ला( विद्या प्रसारणी सभेचे हायस्कूल पूर्णा), रामदास पांचाळ (तुळजाभवानी विद्यालय लोखंडे पिंपळा), दिलीप चव्हाण (जय दुर्गा पोस्ट बेसिक आदिवासी आश्रम शाळा जिंतूर), श्रीमती मंगल हरिभाऊ भवाळे (श्रीमती शकुंतला बाई बोर्डीकर विद्यालय जिंतूर), शेख सगिर शेख नजीर (अंजुमन उर्दू हायस्कूल परभणी), असे पुरस्कार असून जागतिक कीर्तिचे चित्रकार शिवराज जगताप यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवहान मराठा शिवसैनिक सेना, स्व.संजय उर्फ बाळासाहेब शिंदे प्रतिष्ठान, जगदंब मित्र मंडळ, राजे संभाजी तालीम, श्री शैलेश स्टडी सर्कल, मराठा सेवा मंडळ,संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशन, मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेड, राष्ट्रवादी शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, मुख्याध्यापक संघ, व्यसनमुक्ति संघटना, सर्व शिक्षक व प्राध्यापक संघटना, जूनी पेंशन हक्क संघर्ष समिती, स्वाभिमानी संघटना , मावळा संघटना, परभणी कोचिंग क्लासेस असोशिएशन, राजे छत्रपती युवा संघटन, राजे मल्हार मित्र मंडळ, शिवप्रहार मित्र मंडळ आदिनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button