Aurangabad

?धक्कादायक! शहरात २२० बालके कोरोनाबाधित; तर १५ बालरुग्णांची कोरोनावर मात

?धक्कादायक! शहरात २२० बालके कोरोनाबाधित; तर १५ बालरुग्णांची कोरोनावर मात
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : औरंगाबाद शहरात तिसऱ्या लाटेच्या पूर्वीच कोरोनाबाधित बालकांची संख्या वाढल्याचे चित्र आहे. ११ ते २१ मे या दहा दिवसांच्या काळात शून्य ते अठरा या वयोगटातील २२० बालकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यात शून्य ते पाच वयोगटातील बालकांची संख्या ४८ असून, सहा ते अठरा वयोगटातील बालकांची संख्या १७१ आहे. कोरोना संसर्गाची तिसरी लाट बालकांसाठी धोकादायक असल्याचे मानले जात असताना दुसऱ्या लाटेतच करोनाबाधित बालकांची संख्या वाढू लागली आहे.
औरंगाबाद शहरात गेल्या १० दिवसांत २२० बालकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती महापालिकेच्या अहवालातून स्पष्ट झाली आहे. यात सहा ते अठरा वयोगटातील १७१ बालकांचा समावेश आहे. तर १५ अतीगंभीर बालरुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button