India

?️ महत्त्वाचे..JEE Mains परीक्षा मराठीसह 12 भाषेत देता येणार..’असे’ असेल वेळापत्रक..

?️ महत्त्वाचे..JEE Mains परीक्षा मराठीसह 12 भाषेत देता येणार..’असे’ असेल वेळापत्रक..

राष्ट्रीय सामाईक प्रवेश परीक्षा अर्थात ‘जेईई मेन्स’ वर्षभरात चार सत्रात घेतली जाणार आहे. जेईई मेन्स परीक्षेसाठी वेळापत्रक निश्चित केलं आहे, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी ही माहिती दिली.

अशी’ होईल परीक्षा-

16 डिसेंबर 2020 ते 16 जानेवारी 2021 दरम्यान या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात टप्प्याटप्प्यानं ही परीक्षा घेतली जाणार आहे.

पहिले सत्र 23 ते 26 फेब्रुवारी
दुसरे सत्र 15 मार्च ते 18 मार्च
तिसरे सत्र 27 एप्रिल ते 30 एप्रिल
चौथे सत्र 24 मे ते 28 मे

परीक्षेच्या अखेरच्या तारखेनंतर 4 ते 5 दिवसांत निकाल प्रसिद्ध केला जाणार असल्याचं रमेश पोखरियाल निशांक यांनी सांगितलं.

*गोल्डन चान्स- विद्यार्थ्याला 1 किंवा जास्तीत जास्त 4 वेळेस जेईई मेन्स परीक्षा देऊ शकतात. विद्यार्थी परीक्षा 4 पैकी किती वेळेस व 4 पैकी कोणत्या सत्रात द्याव्यात हे ठरवू शकेल. 4 सत्रांपैकी ज्या जेईई मेन्स परीक्षेत अधिक गुण मिळाले आहेत ते गुण ग्राह्य धरले जातील.

मराठीसह 12 भाषेत परीक्षा-

‘एनटीए’ने यंदापासून प्रादेशिक भाषेत परीक्षा देण्याची मुभा विद्यार्थ्यांना दिली आहे. त्यामध्ये इंग्रजीसह हिंदी, मराठी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, ओडीया, पंजाबी, तमीळ, तेलगु, उर्दू या भाषेतही प्रश्‍न विचारले जाणार आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button