Kolhapur

गव्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या विठ्ठल बाजाराची तिन महिण्यापासुन मृत्युशी झुंज : वनविभागाचे दुर्लक्ष

गव्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या विठ्ठल बाजाराची तिन महिण्यापासुन मृत्युशी झुंज : वनविभागाचे दुर्लक्ष

कोल्हापूर प्रतिनिधी संजय वाघमोडे

गारगोटी :
गव्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला फये पैकी लिंगडीचावाडा येथील धनगर गेले तिन महिणे मृत्युशी झुंज देत आहे. विठ्ठल रामू बाजारी (वय-40) असे त्याचे नाव असुन कर्ता पुरूषच अंथरूणावर पडल्यामुळे सात मुलांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. राधानगरी वन विभागाने या जखमीला मदत करण्याऐवजी चक्क गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्यामुळे बाजारी कुटूंब भितीने गारठले आहे. त्यामुळे मृत्युच्या दाढेवर असलेल्या या धनगराला न्याय मिळणार का? अशी विचारणा धनगर समाजातून व्यक्त केली जात आहे.

गव्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या विठ्ठल बाजाराची तिन महिण्यापासुन मृत्युशी झुंज : वनविभागाचे दुर्लक्षभुदरगड तालुक्यातील फये पैकी लिंगडीचा धनगरवाडा येथील धनगर विठ्ठल बाजारी व त्याची पत्नी गंगुबाईसह 13 आक्टोंबर रोजी जंगलातून पायवाटेने वाकीघोल परिसरात रोजंदारीसाठी जात होते. दुपारी 12 वा. सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या गव्याने विठ्ठलची पत्नी गंगूबाईवर हल्‍ला केला. आपला जीव धोक्यात घालून पत्निला वाचविण्यासाठी विठ्ठल मदतीला धावला असता गव्याने विठ्ठलवरच हल्ला चढविला. गव्याने विठ्ठलला जांगेत शिंग मारून गंभीर जखमी केले. त्यामुळे जखमी विठ्ठलवर कोल्हापूर येथील शासकीय रूग्णालयात उपचार करण्यात आले.

मृत्राशयाला जोरात मार बसल्याने त्याच्यावर खासगी रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. यासाठी त्याला लाखो रूपये खर्च करावे लागले. पै-पाहुणे यांच्याकडून पैसे घेऊन दवाखान्याची भागवाभागव करण्यात आली. तरी देखील विठ्ठल बरा झाला नाही. खासगी रूग्णालयाचा खर्च पेलत नसल्यामुळे विठ्ठलला आदमापूर येथील बाळूमामा ट्रस्टच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. अद्यापही तो अंथरूणावर खिळून आहे.

विठ्ठलला सात लहान-लहान मुले असुन पत्नि विठ्ठलबरोबर दवाखान्यात आहे. विठ्ठलची लहान-लहान मुले आई-बाबाच्या वाटेकडे गेले तिन महिणे व्याकुळतेने वाट पहात आहेत. आई-बाबाच्या आठवणींने ध्याय मोकलून रडत आहेत. मुलांच्या या रडण्यामुळे अंगावर शहारे येत आहेत. अशा बिकट परिस्थितीत विठ्ठल बाजारी याचे कुंटूंब असतांना वनविभागाच्या अधिकारी-कर्मचार्‍यांनी मात्र याकडे ढुंकून सुद्धा पाहिलेले नाही अथवा उपचारासाठी मदत केलेली नाही. वनविभाग वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांसाठी मदत करते मात्र राधानगरी वनविभागाच्या अधिकार्‍यांनी विठ्ठलला मदत करण्यासाठी हातच आखडले आहेत. याची चर्चा केल्यास विठ्ठलला गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्यामुळे न्याय कोणाकडे मागायचा? आम्हाला कोण न्याय देणार? अस जखमी विठ्ठलची पत्नी कळवळून सांगत होती. त्यामुळे उपस्थितांचा कंठ दाटून येत होता. गेंड्याची कातडी पांघरलेल्या या वनविभागाच्या अधिकार्‍यांना याची जाग कधी येणार? असा संतप्त सवाला बाजारी कुटूंबियातून व्यक्त केला जात आहे. यावेळी यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय वाघमोडे यांनी धनगर समाजाला जमीन-जुमला नसल्यामुळे धनगर कुटूंबिय गेल्या कित्येक पिढ्या न पिढ्या आपल जंगलमय जीवन कंटत आहेत. मुलभुत सुविधांपासुन वंचीत असलेल्या या समाजाला न्याय देण्यासाठी शासनाने पुढ येण्याची गरज असल्याचे सांगीतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button