Amalner

माझा अभ्यास माझे भविष्य’ स्पर्धेत मानव अंकुश पाटील प्रथम! राष्ट्र सेवादल आयोजित निबंध स्पर्धेत ओम राऊळ, तेजस चौधरी यांनी दाखविली चमक

माझा अभ्यास माझे भविष्य’ स्पर्धेत मानव अंकुश पाटील प्रथम!
राष्ट्र सेवादल आयोजित निबंध स्पर्धेत ओम राऊळ, तेजस चौधरी यांनी दाखविली चमक

अमळनेर- माझा अभ्यास माझे भविष्य या विषयावर आयोजित निबंध स्पर्धेत मानव अंकुश पाटील याने प्रथम क्रमांक पटकावला तर ओम विनोद राऊळ, व तेजस नंदू चौधरी अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या पारितोषिकांचे मानकरी ठरले.
राष्ट्र सेवादलाच्या संस्कार केंद्रात आयोजित या स्पर्धेत 27 स्पर्धक सहभागी झाले होते.
केंद्र संचालक धनंजय सोनार, डॉ मिलिंद वैद्य, दीपक पवार यांचे हस्ते शैक्षणिक साहित्य व खाऊ देऊन गौरविण्यात आले, प्रा अशोक पवार यांनी बक्षिसांचे योगदान देऊन प्रोत्साहन दिले.
या वेळी पालक विनोद राऊळ, शिवाजी महाजन उपस्थित होते.
मिसबाह खाटीक, कृष्णा महाजन, अंशुमन पाटील चार्वी पवार या बाल सैनिकांनी उत्कृष्ट संयोजन केले.
धनंजय सोनार यांनी अभिनंदन करून पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button