Bhusawal

भुसावळात तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या नगरसेवकाच्या पुतण्याला अटक

भुसावळात तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या नगरसेवकाच्या पुतण्याला अटक

रजनीकांत पाटील

भुसावळ प्रतिनिधी ::>शहरातील घोडेपीर बाबा दर्गाजवळ हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करणारा संशयित नीलेश उर्फ गोलू जय सपकाळे (रा. शिवपूर कन्हाळा) याला, बाजारपेठ पोलिसांनी रविवारी सायंकाळी अटक केली.

यासंदर्भात बाजारपेठचे पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांना गुप्त माहिती मिळाली होती. सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरे, सहायक निरीक्षक मंगेश गोटला, किशोर महाजन, रमण सुरळकर, समाधान पाटील, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, योगेश महाजन आणि कृष्णा देशमुख यांनी संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला.

संशयित नीलेश हा नगरसेवक रवी सपकाळे यांचा पुतण्या आहे, असे पोलिसांनी सांगितले. संशयिताने तलवार कुठून आणली याचा पोलिस शोध घेत आहेत. अवैध शस्त्र बाळगणारे संशयित पोलिसांच्या रडारवर आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button