सोशल मीडियावर शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा गणेश फरतडे बनला ‘रॉयल शेतकरी’
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : अत्यंत ग्रामीण भागातून औरंगाबाद सारख्या शहरात शिक्षण घेत असतानाच आपण एक शेतकऱ्याचा पुत्र आहोत आणि आपली बाजू आपण भक्कमपणे मांडली पाहिजे. हा विचार घेऊन गणेश फरतडे या 22 वर्षीय शेतकरी पुत्राने सुरवातीला टिकटॉक सारख्या माध्यमाचा वापर करून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायला सुरवात केली. अल्प कालावधीतच गणेशला टिकटॉकवर प्रचंड प्रदिसाद मिळाला, मात्र सरकारने टिकटॉकवर बंदी आणल्याने गणेश सारख्या लाखो मुलांच्या पदरी निराशा आली.
मात्र, गणेश हार मानणारा नव्हता. त्याने लगेच युट्युबवर “रॉयल शेतकरी” या नावाने अकाउंट ओपन करून तो त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या मुलांचे प्रश्न, समस्या, त्याचबरोबर आपले विचार, मत व्यक्त करू लागला. बघता बघता तीन महिन्यातच गणेशच्या रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनलला 1 लाखापेक्षा अधिक सबस्क्राईब मिळाले. गणेशचा हुरूप आणखीनच वाढला. तो दररोज एक, दोन व्हिडिओ युट्युब सह फेसबुक, इन्स्टाग्रामवर अपलोड करू लागला.
आज त्याचे या प्रत्येक सोशल अँपवर लाखो चाहते निर्माण झाले आहेत. एवढेच नाही तर युट्यूबच्या माध्यमातून त्याला पैसेही मिळू लागले. तसेच गणेश महाराष्ट्रभर शिवव्याख्याता म्हणूनही प्रसिद्ध आहे. आज हजारो लाखो मुलं-मुली सोशल मीडियावर टाईमपास करतात. मात्र गणेशने याच माध्यमाचा सुयोग्य वापर करून तो आज स्टार बनला आहे. अशा या ‘रॉयल शेतकरी पुत्राला लेट्सअप कडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.






