Amalner

Amalner: अवैध गोळ्यांची विक्री… राजमुद्रा मेडिकलवर छापा…

Amalner: अवैध गोळ्यांची विक्री… राजमुद्रा मेडिकलवर छापा…

अमळनेर गर्भपातासाठी अवैध प्रमाणे वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या अमळनेर येथील मेडिकलवर अधिकाऱ्यांनी छापा टाकून कारवाई केली आहे. या संदर्भात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नशा आणि काळया धंदा उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

याबद्दल सविस्तर माहिती अशी की अमळनेर शहरातील नगरपालिकेच्या मालकीच्या दुकान नंबर ५ मध्ये सूरज अधिकार पाटील यांचे राजमुद्रा मेडिकल दुकान आहे. तेथे ५ एप्रिल २०२३ ते ११ जुलै २०२३ दरम्यान मोठ्या प्रमाणावर नशा येणाऱ्या औषधी साठा केला असल्याचे तपासणी अहवालात आढळून आले.
कोडिन सिरप ५५९ बाटल्या, ट्रॅमाडीन १०० इंजेक्शन, निट्रोसून ४५३० गोळ्या खरेदी केल्या असल्याचे दिसून आले. एव्हढ्या मोठ्या प्रमाणात गोळ्या नशेसाठी वापरण्यात आल्या असल्याचे आढळून आल्याने अन्न व औषध निरीक्षक सोमनाथ बाबासाहेब मुळे, सह आयुक्त अनिल माणिकराव, औषध निरीक्षक गजानन धिरके यांनी १९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता राजमुद्रा मेडिकल वर छापा टाकला असता अल्प्रासेफ नावाच्या २२० गोळ्या दिसून आल्या.
या गोळ्या नशेसाठी वापरण्यात येतात. दुकानदार सूरज अधिकार पाटील याने
गोळ्यांची विक्री अथवा वापर बाबत काहीच पुरावे दिले नाहीत. मात्र त्याने चतुर नावाच्या विक्री प्रतिनिधी कडून घेतल्याचे सांगितले. त्यामुळे या गोळ्या अवैधरित्या गर्भपातासाठी वापरण्यात आल्या असाव्यात. म्हणून सोमनाथ मुळे यांच्या फिर्यादीवरून सुरज आणि चतुर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून दोन्ही आरोपी फरार झाले आहेत. तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे व हेडकॉन्स्टेबल सुनील हटकर करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button