Chalisgaon

ब्राम्हणशेवगे येथील राजकिय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व हरपले….

ब्राम्हणशेवगे येथील राजकिय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व हरपले…. 

ब्राम्हणशेवगे येथील राजकिय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व हरपले....

ब्राम्हणशेवगे: ता.चाळीसगाव सोमनाथ माळी
येथील आदर्श शेतकरी तसेच राजकिय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व *उध्दवराव रावजी बाविस्कर* म्हणजेच सर्वांचे लाडके *नाना* याचे दि.२८|०९|२०१९ शनिवार रोजी वयाच्या ६७ व्या वर्षी एका दुर्धर आजाराने दुःखद निधन झाले आणि संपुर्ण गावात शोककळा पसरली.गेली ९ वर्षापासून नाना या आजाराशी लढा देत होते अखेर काल नानावर नियतीने झडप घातली. नानांच्या अकाली जाण्याने राजकिय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाल्याचे मत त्याच्या अत्यविधीसाठी जमलेल्या विशाल जनसमुदायासमोर अनेक वक्त्यानी मांडले. काल नानांच्या अत्यविधीसाठी कधी नाही असा जनसमुदाय जमला होता. 
 नानाची शैक्षणिक क्षेत्रातील प्रेरणादायी छाप खर्याअर्थाने सन १९८८ साली सुरू झालेल्या टेक्निकल माध्यमिक विद्यालय पासून तर राष्ट्रीय सह.शिक्षण प्रसारक मंडळ संचालक पदापर्यत भरीव योगदाना दरम्यानची ठरली.नानाच्या सहकार्यामुळे टेक्निकल माध्यमिक विद्यालयात विनापगार आदर्श विद्यार्थी घडवणारे एस.एस.पाटील सर,दराडेसर,साळुंखे सर,सोनवणे सर इ.सरानी स्वताःच्या आयुष्यातले एक दशक तुलशिपत्र ठेवून कार्य केले ते फक्त नानांच्या आग्रहास्तव.  राजकिय क्षेत्रातही ते गावकरी बाधवाच्या आग्रहास्तव  उतरले व सन १९९६ साली गावाच्या इतिहासातील पहिल्या महिला *सरपंच* म्हणून त्याच्या पत्नी *नयनाबाई उध्दवराव बाविस्कर* या निवडून आल्या.सन१९९६ ते २००० हा कालखंड हा खर्याअर्थाने गावाच्या विकासाचा व कायापालट करणारा असा ठरला.कारण शेतीसाठी पाणी असेल तर शेतकरी सुखी ही बाब नानानी ओळखली आणि अरूण निकम सरांच्या मार्गदर्शनाखाली *पाणलोट विकास योजना* राबविण्यात येऊन गाव परिसर  *पाणीदार* करण्यास सुरुवात केली.तसेच  याच कालखंडात गावात सोमनाथ माळी, राजेंद्र माळी, शाताराम शिर्के,सुधाकर शिर्के, सुभाष शिर्के इ. तरूणांच्या मदतीने गावात *हातभट्टी दारू बंद* करण्यात आली असून नानांच्या मार्गदर्शनाखाली रत्नाकर आणि पद्माकर हि दोन्ही मुले गावाच्या सर्वांगीण विकासासाठी नानांच्या  पावलावर पाऊल ठेवून वाट चाल करत आहेत.
   नानांचा स्वभाव अतिशय मनमिळाऊ होता.लहान असो की मोठे नाना सर्वांशी आपुलकीने बोलत.नानाच्या शेतात नेहमीच शेतमजुर असायचे नाना नेहमीच त्याच्या सुखदुःखात धाऊन जायचे म्हणून ते शेकडो कुटुंबाचे आधार स्तंभ होते. नानाचा हसतमुख चेहरा कुठल्याही संकटाला एक प्रेरणादायी असाच होता.नऊ वर्षापासून दुर्धर आजाराने ग्रस्त असताना देखील त्यांनी खचून न जाता शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या चेहर्यावर दू:खाचे सावट दिसू दिले नाही.  गावातील तरूण वर्ग हा नानाच्या प्रेरणेने चांगल्या ठिकाणी कार्यरत आहेत.
नानांचे अकाली जाणे त्याच्या बाविस्कर टुंबियांनाच नाही तर गावालाही हुरहुर लाऊन देणारे,चटका लाऊन जाणारे असेच आहे.नानांचे अकाली जाणे म्हणजे राजकिय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील  कधीही  न भरून निघणार पोकळी निर्माण झाली आहे.
     ब्राम्हणशेवगे गावाच्या इतिहासातील हुरहुन्नरी आणि आदर्श शेतकरी आभासी जगात न वावरणारा व कष्टावर विश्वास  ठेवणारा हिरा म्हणजे *उध्दवनाना* आज आपल्यात नाही यावर विश्वास बसत नाही.
नानांना भावपूर्ण श्रध्दांजली… 
       
       

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button