Amalner

? Big Breaking…अमळनेर उपविभागीय कार्यालयातर्फे कोरोना योद्धयांचा सन्मान पत्र देऊन सत्कार..उपविभागीय अधिकारी सिमा अहिरे यांनी ठेवली कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप

अमळनेर उपविभागीय कार्यालयातर्फे कोरोना योद्धयांचा सन्मान पत्र देऊन सत्कार..

वैद्यकीय, पोलीस ,महसूल विभागातील सरकारी डॉ,कर्मचारी यांचा सन्मान…

अमळनेर येथील उपविभागीय कार्यालया तर्फे आज राष्ट्रपिता म गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त सरकारी डॉ कर्मचारी यांना कोरोना काळातील भरीव योगदानाबद्दल सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.कोरोना विषाणूच्या अत्यन्त कठीण काळात अमळनेर शहरातील तालुक्यातील डॉ,पोलीस कर्मचारी, सरकारी कर्मचारी इ नी वेळ,काळ न पाहता रिस्क घेत भरीव कामगिरी केली. यासर्व पार्श्वभूमीवर अमळनेर च्या उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांनी ठरविले की या शिलेदारांचा सन्माम करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप ठेवावी. उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे या तर अहोरात्र कार्यरत आहेतच पण त्यांच्या कार्याला पाठबळ देण्याचे काम सर्व डॉ,कर्मचारी यांनी केले आहे.

आज तहसील कार्यालयात राष्ट्रपिता म गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती चे औचित्य साधत उपविभागीय अधिकारी सिमा अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना योद्धयांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.

? Big Breaking...अमळनेर उपविभागीय कार्यालयातर्फे कोरोना योद्धयांचा सन्मान पत्र देऊन सत्कार..उपविभागीय अधिकारी सिमा अहिरे यांनी ठेवली कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप

यावेळी आपल्या मनोगतात अमळनेर चे तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांनी सर्व लहान मोठ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले आणि आपण सर्वांनी एकत्र कार्य केले म्हणून आज आपण कोरोनाच्या लढाईत यशस्वी आहोत असे मत व्यक्त केले. यावेळी मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड,वैद्यकीय अधिकारी डॉ महाजन, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या प्रा जयश्री दाभाडे ,सपोनि सदगीर यांनी देखील मनोगत व्यक्त केले.

? Big Breaking...अमळनेर उपविभागीय कार्यालयातर्फे कोरोना योद्धयांचा सन्मान पत्र देऊन सत्कार..उपविभागीय अधिकारी सिमा अहिरे यांनी ठेवली कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप

यावेळी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, अमळनेर नगरपरिषद मुख्याधिकारी विद्या गायकवाड,उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे,स पो नि श्री प्रकाश सदगीर, डॉ शरद पाटील गोपनीय अंमलदार,श्री राजेंद्र चौधरी नायब तहसीलदार, डॉ गिरीश गोसावी तालुका वैद्यकीय अधिकारी, डॉ प्रकाश महाजन,डॉ राजेंद्र शेलकर,डॉ आशिष पाटील,हरीश कोळी स्टेनो,संजय चौधरी,लिपिक,दिनेश सोनवणे लिपिक,सुधीर गरूडकर लिपिक,नितीन ढोकने लिपिक,संदीप पाटील लिपिक, मुकेश काटे लिपिक, दिलीप पाटील ,सचिन पाटील वाहन चालक, राजाराम पाटील इ चा सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ शरद पाटील यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button