Maharashtra

“वारली चित्र” असलेले विशेष लिफाफाचे प्रकाशन…..

आदिवासींचा “चित्र संदेश” उज्वल जीवन सृष्टी साठी महत्वपूर्ण”

“वारली चित्र” असलेले विशेष लिफाफाचे प्रकाशन…..

&Quot;वारली चित्र&Quot; असलेले विशेष लिफाफाचे प्रकाशन.....

२८ जून २०१९, कासा, तालुका डहाणू प्रतिनिधी
हजारो वर्षांपासून समूहाने निसर्गाच्या सानिध्यात पर्यावरणाचे तसेच सभोवतालच्या जीवश्रुष्टी सोबत आदिवासी समाज राहतो आहे. त्यांनी अनेक पिढ्यांपासून मौखिक ज्ञानातून, सांकेतिक लिपीतून आपले पारंपरिक ज्ञान आणि बौद्धिक संपदा,परंपरा जतन केली आहे. उत्तर सह्याद्रीतील चित्रलिपी सटी, नदर काढणे, गऊर काढणे, कणा काढणे, फडाच्या देवी, चवूक लिहणे, देव चवूक लिहणे इत्यादी पारंपरिक चालीरीतींत मानाने काढल्या जातात. आज याचे एक स्वरूप “वारली चित्रकला” म्हणून जगभर प्रसिद्धीस आले आहे.

&Quot;वारली चित्र&Quot; असलेले विशेष लिफाफाचे प्रकाशन.....

आदिवासी विकास विभाग यांच्या सहकार्याने “आदिवासी युवा सेवा संघ” (आयुश) या स्वयंसेवी संस्थे मार्फत वारली चित्रकला असलेले विशेष लिफाफा भारतीय टपाल खात्यातुन  प्रकाशित करण्यात आले. यासाठी निवडलेले चित्र पारंपरिक तारपा नृत्य आणि निसर्गा सोबत दैनंदिन जीवनशैली दाखविलेली आहे. पर्यावरण जतन, तांत्रिक कौशल्य, जीवनमूल्य, एकोपा, सुखदुःखात एकमेकांसोबत राहणे, सभोवतालच्या जीवनश्रुष्टी सोबत एकमेकांना पूरक असे एकात्मिक जीवन जगणे हा आजच्या आणि भविष्यातील पिढ्याना खूप मोलाचा संदेश देत आहेत. या लिफाफा द्वारे हा संदेश लोकांपर्यंत पोचेल अशी भावना आहे. आयुश तर्फे आयोजित कार्यक्रमात २८ जून २०१९ रोजी बिरसा मुंडा सभागृह ग्राम पंचायत कासा, तालुका डहाणू, जिल्हा पालघर येथे प्रकाशित करण्यात आले. 

&Quot;वारली चित्र&Quot; असलेले विशेष लिफाफाचे प्रकाशन.....
 
या कार्यक्रमात विशेष अतिथी पोस्टमास्टर जनरल नवी मुंबई रिजन शोभा मधाळे (IPoS), यांनी वारली चित्रकलेशी असलेली त्यांची ओळख आणि विविध कला प्रसिद्धीसाठी टपाल खात्याकडून घेतले जाणारे पुढाकार यांची माहिती दिली.सोबत स्टेजवर वाघाडी येथील सवासीन धवलेरी वांगड आई, लिफाफ्यावरील बनवणारे संजय पऱ्हाड, प्रसिद्ध कलाकार रमेश हेंगाडी यांनी सांस्कृतिक आणि कलेचे पैलू याची याची माहिती दिली. आयुश चे प्रतिनिधी जयवंत सोमण यांनी  
सध्याचे उपक्रम विषयी  माहिती दिली. सचिन सातवी यांनी वारली चित्रकला भौगोलिक उपदर्शनी, आदिवासी स्वावलंबी अर्थव्यवस्थेसाठी चे महत्व आणि आयुश वारली चित्रकला क्लस्टर उपक्रम बद्दल माहिती दिली. स्टेजवरील उपस्थित मान्यवरांना आयुश तर्फे वारली चित्रांची फ्रेम भेट म्हणून देण्यात आली. त्यात पर्यावरण विषयाचे चित्र आणि “कलेतून परंपरा जगूया, स्वावलंबी समाज घडवूया” हा एक ओळीचा संदेश लिहण्यात होता. 
आयुश समन्वयक बंडू वडाळी यांनी सूत्रसंचालन केले तसेच पूनम चौरे, बबिता वरठा, सुचिता कामडी, स्वप्निल दिवे, यांनी सगळे नियोजन सुरळीत पाडले. या वेळेस येथे हस्तशिल्प खात्यामार्फत देण्यात येणाऱ्या ओळखपत्रासाठी नोंदणी अर्ज, नमुना कलावस्तू संकलन, आधार कार्ड दुरुस्ती, बँक खाते उघडणे, माय स्टँम्प, इत्यादी सुविधा उपलब्ध होत्या. त्याच्या अनेक कलाकरांनी आणि परिसरातील सामान्य नागरिकांनी लाभ घेतला. द्वितीय सत्रात कलाकार एकत्रीकरण बैठक  आली आणि सध्या पर्यंत आणि आगामी उपक्रमांची माहिती देण्यात आली.         
 
हि कला आणि सांस्कृतिक मूल्यांबद्दल जागरूकता व्हावी जतन व्हावी या साठी अनेक जन प्रयत्न करीत आहेत. सध्या आदिवासी कालावस्तूंची मागणी लक्षात घेता आदिवासी कलाकारांना आर्थिक स्वावलंबसाठी हातभार लावावा या उद्देशाने समाज, शासकीय, खाजगी यांच्या माध्यमातुन सामाजिक उद्यमीता बांधणी सुरु आहे. आदिवासी विकास विभाग, असेच भारतीय राष्ट्रीय भुगतान निगम यांच्या सहकार्याने वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती या नावाने आयुश मार्फत प्रयत्न सुरु आहेत. जास्तीत जास्त आदिवासी कलाकारांनी यात सहभागी होऊन उपक्रम यशस्वी करावा असे आयुश तर्फे कळवण्यात आले.  
 

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button