Solapur

?️कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहीम आवश्यक- डॉ. यशवंत सातपुते

?️ कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहीम आवश्यक- डॉ. यशवंत सातपुते

जि.प.प्रा.शाळा व्होळे खुर्द केंद्र अरण येथे लसीकरण मोहीम संपन्न

देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखायचा असेल तर ४५ वर्षावरील सर्व नागरिकांनी स्वतः हुन कोविशील्ड लस घ्यावी असे उद्गगार परिते प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. यशवंत सातपुते यांनी काढले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्होळे खुर्द येथील लसीकरण मोहिमेच्या वेळी ते बोलत होते.
अरण केंद्राचे केंद्रप्रमुख डॉ. विलास काळे यांनी कोविशील्ड लस सुरक्षित आहे. आपल्या गावामध्ये लसीकरण मोहीम चालू झाली आहे. आपल्या गावातील ४५ वर्षावरील सर्व नागरिकांनी लसीकरण मोहीमेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.
सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभाग, शिक्षण विभाग व प्राथमिक आरोग्य केंद्र परिते उपकेंद्र वरवडे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्होळे येथे कोविशील्ड लसीकरण कॅम्पचे आयोजन करण्यात आले. कोविशील्ड लसीकरण कॅम्पमध्ये ४५ वर्षे वयाच्या पुढील पात्र २४१ लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
दिनांक १० एप्रिल २०२१ रोजी सकाळी ठिक १०.०० वाजता मोडनिंब प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. प्रदिप पाटील -भेंडकर, परिते प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.यशवंत सातपुते व अरण केंद्राचे केंद्रप्रमुख डॉ. विलास काळे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन ८५ वर्षाचे वयोवृद्ध व्यक्ती ला लस देऊन लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. वरवडे उपकेंद्र येथील आरोग्य अधिकारी डॉ. गव्हाणे मॅडम , परिते आणि वरवडे केंद्राचे आरोग्य कर्मचारी, आशा, सेविका, अंगणवाडी सेविका तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सौदागर चोपडे, सुग्रीव चोपडे, बाळासाहेब चोपडे सरपंच व्होळे, बाळासाहेब गजेंद्र चोपडे उपसरपंच व्होळे, ग्रामपंचायत सदस्य पोपट भोरे,गणेश चोपडे, गोपाळ भोरे,पोपट ठेंगल, महेश क्षीरसागर, पोलीस पाटील सागर थोरे, राजाभाऊ चोपडे, ग्रामसेवक देवकते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी अरण केंद्राचे केंद्र प्रमुख डॉ. विलास काळे, व्होळे शाळेचे मुख्याध्यापक श्री. क्षीरसागर, ठेंगल वस्ती चे मुख्याध्यापक श्री. ढेंबरे, चोपडे वस्ती चे मुख्याध्यापक श्री. संतोष क्षीरसागर नवनाथ शिंदे, ज्योत्स्ना बोराटे, रघुनाथ थोरात,विजय पाटील,शरद का़बळे, उज्वला पाटील यांनी नागरिकांचे घरोघरी जाऊन ऑनलाईन लसीकरण नोंदणी, लसिचे महत्व, जनजागृती केली होती. आज सर्व कर्मचारी यांनी हिररीने सहभागी होऊन लसीकरण मोहीम यशस्वी पार पाडली. सुत्रसंचलन आप्पा जाधव व आभार विलास क्षिरसागर यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button