Delhi

Big Breaking सीएए, एनआरसी समर्थक आणि विरोधक तणाव दुसऱ्या दिवशी ही सुरु..दोन्ही गटांमध्ये तणाव 4 ठार, 37 पोलीस गंभीर जखमी

Big Breaking

सीएए, एनआरसी समर्थक आणि विरोधक तणाव दुसऱ्या दिवशी ही सुरू

दोन्ही गटांमध्ये तणाव 4 ठार, 37 पोलीस गंभीर जखमी

प्रा जयश्री दाभाडे

सीएए, एनआरसी विरोधाक आणि समर्थक यांच्यात सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीत भडका उडाला आहे.

हिंसाचार : सीएए समर्थक आणि विरोधकांमध्ये झालेल्या दगडफेक आणि गोळीबारात आतापर्यंत चार जण ठार तर शहादराचे डीसीपी अमित शर्मा यांच्यासह 37 पोलीस गंभीर जखमी झाले आहे. संतप्त जमावाने पेट्रोल पंप, पोलीस व्हॅनसह अनेक गाडय़ा जाळल्या. पोलिसांनी 10 भागांमध्ये जमावबंदी लागू केली आहे.

परिसरातील शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली असून बोर्ड परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहे.

केजरीवालांकडून केंद्राला आवाहन
दिल्लीतील तणाव वाढत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेची काळजी घेण्यासाठी त्वरित पावले उचलावीत, असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्रालय आणि नायब राज्यपालांना केले आहे.

सतत दुसऱ्या दिवशी हा तणाव निर्माण झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button