?️अमळनेर कट्टा…प्रताप हायस्कूल येथील संगणक चोर मुद्देमलासह पोलिसांच्या ताब्यात…!अवघ्या 9 दिवसांत लावला तपास..उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो नि जयपाल हिरे यांची कौतुकास्पद कामगिरी…!
अमळनेर येथील प्प्रताप हायस्कूल मध्ये झालेल्या चोरीचा आरोपी मुद्देमलासह पोलिसांनी ताब्यात घेतला असून अवघ्या नऊ दिवसांत तपास करून आरोपी ताब्यात घेण्याची उत्तम कामगिरी पो नि जयपाल हिरे यांनी पार पाडली आहे.
या संदर्भातील अधिक माहिती अशी की दिनांक २४/०४/२०२१ रोजी दुपारी १२.०० ते दिनांक २७/०४/२०२१ रोजीचे ११.३० वाजेचे दरम्यान अमळनेर शहरात प्रताप हायस्कूल मधील संगणक कक्षात घडला असून फिर्यादी प्रमोदिनी बलीराम पाटील वय ५४ वर्षे धंदा नोकरी रा. प्रताप हायस्कूल अमळनेर यांचे फिर्यादवरुन दिनांक १०/०५/२०२१ रोजी १७.४४ वाजता अज्ञात चोरटयाविरुध्द ३२,०००/- रुपये किंमतीच्या अॅमरॉन कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या १६ नग संगणकाच्या बॅटऱ्या प्रत्येकी २००० रुपये किंमतीच्या जु. वा. चोरुन नेलेबाबत गुन्हा दाखल असून पोलीस तपासात खात्रीलायक माहिती प्राप्त झाल्यावरून मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साो, श्री. राकेश जाधव सो, अमळनेर भाग अमळनेर यांचे मार्गदर्शनाखाली पोनि/ जयपाल हिरे यांनी अमळनेर पोलीस स्टेशनकडील हेकॉ, ४१८ सुनिल कौतिक हटकर, पोना, २९७३ दिपक शांताराम माळी पोकॉ,३३३१ रविंद्र अभिमन पाटील असे सदर पथकाने आपले कौशल्य पणाला लावून व शिताफीने आरोपी शाबीर शेख निसार वय २१ वर्षे रा. श्रध्दानगर गलवाडे रोड अमळनेर यास
अटक करुन तसेच त्याचे सोबत २ विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेवून त्यांचेकडून गुन्हयात गेलेला ३२,०००/- रुपये किंमतीच्या अॅमरॉन कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या १६ नग संगणकाच्या बॅटऱ्या प्रत्येकी २००० रुपये किंमतीच्या जु. वा. हस्तगत करण्यात आला आहे गुन्हयाचा पुढील तपास मा. पोनि, जयपाल
हिरे यांचे मार्गदर्शनाखाली हेकॉ, ४१८ सुनिल हटकर हे करीत आहेत.






