Ratnagiri

शिवसेना आमदार लताबाई सोनवणे यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याचे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे जिल्हाधिकारी जळगांव यांना निर्देश पञ

शिवसेना आमदार लताबाई सोनवणे यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याचे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे जिल्हाधिकारी जळगांव यांना निर्देश पञ

दिलीप आंबवणे रत्नागिरी

रत्नागिरी : अवर सचिव व उप मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जळगांव यांना जातप्रमाणपञ अवैद्य ठरलेल्या आमदार सौ. लताबाई सोनवणे यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करणेबाबतचे निर्देश पञ जारी केले आहे. सदर निर्देश पञ निवेदक सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांना दिनांक 10 फेब्रुवारी 2021 रोजी पोस्टाने प्राप्त झाले आहे. सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी दिनांक 07/10/2021 रोजी मा.मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांना निवेदन पाठविले होते. त्या निवेदनाची दखल घेत मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य कार्यालय मंञालय मुंबई यांनी हे पञ जिल्हाधिकारी जळगांव यांना उचित कार्यवाहीसाठी पाठवले आहे.
चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीम. लताबाई महारू कोळी (सौ. लताबाई चंद्रकांत सोनवणे)यांचा अनुसूचित जमातीचा दाखला जात पडताळणी समिती नंदुरबार कार्यालयाने दिनांक 04/10/2020 रोजी अवैद्य ठरविला आहे.सन 2019 मधील विधानसभा निवडणुकीत सौ. लताबाई सोनवणे यांनी अनुसूचित जमाती च्या दाखल्या आधारे उमेदवारीचा अर्ज दाखल करून शिवसेना पक्षातर्फे निवडणूक लढवली आहे. चोपडा अनुसूचित जमाती राखीव मतदारसंघ संघातून राखीव उमेदवार म्हणून त्या निवडून आलेल्या आहेत.त्याचवेळी दिनांक 25 नोव्हेंबर 2019 रोजी राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार तथा तक्रारदार श्री.जगदीश रमेश वळवी व तक्रारदार अॅड.अर्जूनसिंग दिवाणसिंग वसावे यांनी सौ. लताबाई सोनवणे यांच्या जातप्रमाणपञ दाखल्याबद्धल नंदुरबार येथील जात पडताळणी समिती कार्यालयात तक्रार दाखल केली होती.सौ. लताबाई सोनवणे ह्या अनुसूचित जमातीच्या कोणत्याच जातीत नाहीत.त्यांचे टोकरेकोळीचे जातप्रमाणपञ बेकायदेशीर आहे. असा आक्षेप तक्रारीत नोंदवण्यात आला होता. त्या तक्रारीची सखोल चौकशी करून अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समिती नंदुरबार यांनी दिनांक 04/10/2020 रोजी सौ.लताबाई सोनवणे यांचा महादेव कोळी जातीचा दावा केलेला जातीचा दाखला अवैद्य ठरविला आहे. त्यामुळे सदर व्यक्ती ही अनुसूचित जमातीची नसल्याचे सिद्ध झाले आहे. म्हणून सौ. लताबाई सोनवणे यांचे विधानसभा सदस्यत्व तात्काळ रद्द करण्यात यावे.तसेच सौ.लताबाई सोनवणे यांनी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र आधारे बेकायदेशीर आरक्षणाचे सर्व फायदे घेतले आहेत, म्हणून महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती,भटक्या जमाती, इतर मागासवर्ग,विशेष मागासवर्ग (जातप्रमाणपञ देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनीयमन)अधिनियम 2000 च्या कलम 10 व 11 अन्वये उचित कारवाई करण्यात यावी. अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचेकडे केली होती. याच प्रकारचे निवेदन डाॅ.हिरा पावरा उपाध्यक्ष (जयस )जय आदिवासी युवा शक्ती संघटनेनेही पाठवले होते.त्याचीही दखल घेत जयस संघटना व बिरसा क्रांती दल संघटना या दोन्ही संघटनेस मुख्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांनी याबाबत निवेदकांना कळविले आहे.
सौ. लताबाई सोनवणे चोपडा विधानसभा आमदार यांच्यावर जिल्हाधिकारी जळगांव व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य कोणती कारवाई करतात, याकडे सगळ्यां महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button