Maharashtra

सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे पंतप्रधान सहाय्यता निधीला 51 हजाराची देणगी फोटो

सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे पंतप्रधान सहाय्यता निधीला 51 हजाराची देणगी फोटो

प्रतिनिधी सलिम पिंजारी

येथील सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट या धार्मिक व सेवाभावी संस्थेने ५१ हजार रुपयांची देणगी कोरोना ग्रस्तांसाठी पंतप्रधान सहाय्यता निधीला दिली आहे. आज सकाळी प्रांत डॉ. अजित थोरबोले यांना ५१ हजार रुपयांचा चेक सुपूर्द करण्यात आला. यावेळी महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी देशाप्रती प्रेम, आपुलकी, बंधुभावभाव असून कोरोना या संकटावर मात करण्यासाठी एक खारीचा वाटा म्हणून सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेतर्फे ५१ हजार रुपये देणगी देण्यात आली. समाजातील सेवाभावी नागरिकांनी सढळ हाताने पंतप्रधान सहाय्यता निधी व मुख्यमंत्री सहायता निधीला दान देऊन सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी प्रांत डॉ. अजित थोरबोले यांनी शासन करीत असलेल्या उपाययोजना, यात नागरिकांचा सहभाग व आपल्यासारखे संतमहंत यांनी पुढाकार घेऊन कोरोना परिस्थितीवर मात करण्यासाठी सविस्तर चर्चा केली. त्यासाठी सर्वांना मिळून प्रयत्न करावे लागणार आहे. आपण यात नक्कीच सफल होऊ. मात्र नागरिकांनी संयम ठेवून आपल्यासह मुलाबाळांची काळजी घ्यावी व घाबरून न जाता आलेल्या संकटाला तोंड देणे महत्त्वाचे ठरेल असे त्यांनी सांगितले. शेवटी महाराजांचे आभरही मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button