Dhule

कोडीद आरोग्य उपकेंद्र येथे जागतिक सिकलसेल दिवसानिमित्त तपासणी शिबिर

कोडीद आरोग्य उपकेंद्र येथे जागतिक सिकलसेल दिवसानिमित्त तपासणी शिबिर

राहुल साळुंके धुळे

धुळे : आज दिनांक १९जुन २०२१ हा जागतिक सिकलसेल दिन म्हणून आपल्या उपकेंद्र,कोडीद येथे साजरा करण्यात आला.
त्यानिमित्त उपकेंद्र कोडीद येथे सिकलसेल चाचणी शिबिर आयोजित केले गेले. चाचणी शिबिरात १ते४५ वर्षे वयोगटातील व्यक्ती, गरोदर मातेची सिकलसेल तपासणी करण्यात आली.

महत्वाचे म्हणजे सिकलसेल ग्रस्त मुले व ग्रस्त प्रत्येक व्यक्तीस महाराष्ट्र शासनाकडून दरमहा १०००रुपये व महाराष्ट्रभर मोफत बस प्रवाससेवा आहे.
ह्यासाठी जे लाभार्थी आहे त्यांनी उपकेंद्र,कोडीद येथे येऊन भेट दिली व लागणारी कागदपत्रे सुपूर्द करून त्यासाठी सर्व तऱ्हेची मदत व मोबदला मिळवून दिला जाईल असे आवाहन उपकेंद्र, कोडीद येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ हिरा पावरा व आरोग्य सेविका श्रीमती प्रमिला गिरासे ह्यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button