शेळ्या मेंढ्याचे उत्पन्न वाढीसाठी सकस व मुबलक प्रमाणात चारा महत्त्वाचा-डॉ. वाय.ए.पठाण उपायुक्त पशुसंवर्धन
पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे- आज दि.२३/५/२०२० रोजी शेळ्या मेंढ्या मध्ये मान्सून पुर्व अंत्रविषार (इ टी व्ही ) लसीकरणाची सुरुवात पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ खुपिरे ता.करवीर येथे.मा.पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय .ए.पठाण व.मा.जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार यांनी केली.यावेळी यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय वाघमोडे उपस्थित होते.
यावेळी संजय वाघमोडे यांनी सध्या लाँकडाऊनमुळे मेंढपाळ यांना स्थालांतर करताना येणाऱ्या अडचणी सांगुन शासनाने अट घालून स्थलांतराची परवानगी दिलेली आहे. त्याऐवजी विनाअट स्थलांतरास परवानगी मिळावी यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत प्रयत्न करावेत अशी विनंती केली. डॉ. वाय.ए.पठाण व डॉ. विनोद पवार यांनी मेंढपाळ यांना मार्गदर्शन केले. शेळ्या मेंढ्यांचे कळप जिल्ह्याबाहेर स्थालांतरीत करताना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्या सोशल डिस्टिंगशींग नियम पाळून सोडविण्यात आल्या आहेत.डॉ. पठाण व डॉ विनोद पवार साहेब यांनी शेळ्या मेंढ्यांचे जंतुनाशक व लसीकरणाचे महत्त्व पटवून सांगितले. कळपामध्ये.दोन वर्षापैक्षा जास्त एकच नरमेंढा वापरला तर जन्माला येणाऱ्या वंशावळी मध्ये.कसे दृष्यपरिणाम दिसून येतात व ते टाळण्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे.हे समजावून सांगितले. तसेच मेंढ्यामधील चांगले अनुवांशिक गुण जसे जुळे पिल्लांचे प्रमाण जास्तीत जास्त उत्तम प्रकारची लोकर जास्तीत जास्त दुध उत्पादन वाढवायचे असेल तर शेळ्या मेंढ्यांना सकस व मुबलक प्रमाणात चारा असणे महत्त्वाचे आहे हे पटवून सांगितले.
सर्व मेंढ्यांना सोशल डिस्टिंगशींगचे नियम पाळून लसीकरण करण्यात आले. मेंढपाळांना जंतुनाशक औषधे व शेळ्या मेंढ्यांच्या वाढीसाठी टानिक वाटप करण्यात आले. यावेळी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी डॉ गायकवाड व कर्मचारी उपस्थित होते. तसेच तालुका पशुधनविकास अधिकारी डॉ. राजू सावळकर,डॉ. लक्ष्मण करपे, राम कोळेकर, संजय हराळे ,शिवाजी हराळे, मारूती हराळे, भिकाजी हराळे ,उत्तम हराळे ,बाळु हराळे,भगवान हराळे तानाजी हराळे, बडोपंत हराळे, अवघडी हराळे, अक्षय हराळे, सौरभ हराळे, ओंकार हराळे, संभाजी हराळे, राजु हराळे,इत्यादी मेंढपाळ उपस्थित होते.






