प्रभाग क्रं 14 मधे सॅनिटायझर कक्षाचे उद्घाटन
अमळनेर नूरखान
कोरोना आजाराचा प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी अमळनेर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रं 14 विद्या विहार कॉलनीच्या प्रवेशद्वार जवळ अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी व आवश्यक कामा निमित्त बाहेर गेलेल्या परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दुष्टीने नगरसेविका श्रीमती कमलबाई पितांबर पाटील यांच्या मार्गदर्शना खाली सॅनिटायझर कक्ष उभे करण्यात आले असून कक्षाचे उद्घाटन तहसीलदार मिलिंद वाघ व उपमुख्याधिकारी संदिप गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले, असून त्या ठिकाणी स्प्रे करण्यासाठी फवारणी मशीन ठेवण्यात आले आहे.अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी, प्रभाग 14 मधील व परिसरातील नागरिकानीं याचा लाभ घ्यावा असे आव्हान रवि पाटील यांनी केले आहे.
सॅनिटायझर कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी रवि पाटील, अविनाश सदांनशिव, नागो पाटील, संजय चौधरी मा. प्रशासन अधिकारी नगरपरिषद अमळनेर, कपील पाटील (म.पोलीस),एस.जी.पाटीलसर, खैरनार सर, डी.एस.पाटील, शिवनारायण पाटील, संजय पाटील, अश्विन पाटील, किशोर सैदांणे, जयंत पाटील, डॉ.रईस बागवान, रोहित तेलेसर, अमोल पाटील, विनोद पाटील(मातोश्री मंडप), प्रविण पाटील, योगेंद्र बाविस्कर, सागर विसपुते, महेश पाटील, किरण अहिरे व नगरपरिषद कर्मचारी इ.परिसरातील नागरिक उपस्थित होते.
आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा.आपल्या सोबत इतरांचीही काळजी घ्या.






