? गोळ्या संपल्या की पदो अवनती झाली म्हणून डोकं फिरलं!
144 कलम मध्ये लोकांना एकत्र करण्याचे आवाहन…शासकीय अधिकारीच करत आहेत कायद्याचं उल्लंघन…
प्रा जयश्री दाभाडे
अमळनेर माजी गटविकास अधिकारी यांनी दि 27 जून रोजी जवखेडा येथे दहा हजार वृक्ष लागवड करण्यासाठी एकत्रित येऊन श्रमदान आणि वृक्ष लागवड करण्याचे आवाहन केले आहे. हे आवाहन म्हणजे शुद्ध गोळ्या संपण्याचे लक्षण आहे.
अमळनेर तालुक्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाने धुमाकूळ घातला आहे. या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन सुरू असून संपूर्ण देशात आणि जिल्ह्यात 144 कलम प्रमाणे संचारबंदी लागू करण्यात आली आहे.5 पेक्षा अधिक व्यक्ती एका ठिकाणी थांबू शकत नाही किंवा एकत्र येऊ शकत नाही. या नियमामुळे प्रेतयात्रा,लग्न समारंभ इ मह्त्वाच्या ठिकाणी देखील मर्यादित संख्या तसेच परवानगी घ्यावी लागत आहे. सामान्य माणसाचे जन जीवन विस्कळीत झाले आहे.
अश्या स्थितीत पंचायत समितीचे माजी गट विकास अधिकारी जवखेडा येथे प्रशासकीय अधिकारी, लोक प्रतिनिधी,सामाजिक कार्यकर्ते आणि जनता यांना आवाहन करत आहेत की 27 जून रोजी जवखेडा येथे वृक्षारोपणा साठी एकत्रित यावे आणि कोरोना घेऊन जावे….तालुक्यातील ग्रामीण भागात अजून तरी फार जास्त प्रमाणात कोरोना संसर्ग नाही पण शासकीय अधिकाऱ्यांच्या अश्या तुघलकी वागणुकी मुळे निश्चितच ग्रामीण भागात कोरोना संसर्ग वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवून चारा घोटाळा तर करत नाहीत ना? हागणदारी लुटली आता बिहार पॅटर्न ..दहिवद गावात बिहार पॅटर्न च्या नावा खाली काय चाललं आहे याचा लवकरच लेखा जोखा ठोस प्रहार मांडणार आहेच पुराव्यानिशी…
प्रशासकीय अधिकारी आणि लोक प्रतिनिधी आता काय करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सामान्य जनतेला 144 कलम अंतर्गत कायद्याचा बडगा दाखवून परेशान करणारे शासन आता स्वतः च्या च बाळ्या वर काय कार्यवाही करत हे पाहणे खूप मजेशीर ठरणार आहे.निवेदन द्यायला पाच व्यक्तीं ना परवानगी नाकारणारऱ्या प्रशासनाच्या भूमिकेकडे लोकांचे लक्ष लागून आहे.इथे तर जाहीर रित्या एकत्रित येण्याचे जाहीर आवाहन एक प्रशासकीय अधिकारी च करत आहे.! या संदर्भात माजी आमदार देवदूतांचे देवदूत यांनी चांगलीच कान उघडणी केल्याचे ही ऐकिवात आहे.पाहू या घोडा मैदान जवळ आहे… या तुघलकी प्रशासकीय अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात येतो का?






