Amalner

?️अमळनेर कट्टा माजी नगरसेवक व अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन श्री प्रविण श्रीराम पाटील यांची नुकतीच ग्रामीण रुग्णालयाच्या अशासकीय सदस्य पदी नियुक्ती

?️अमळनेर कट्टा माजी नगरसेवक व अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन श्री प्रविण श्रीराम पाटील यांची नुकतीच ग्रामीण रुग्णालयाच्या अशासकीय सदस्य पदी नियुक्ती

अमळनेर : अमळनेर शहरात ज्यांची ओळख आरोग्यदूत या नावाने आहे असे अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि नेहमीच समाजकार्याची आवड असलेले माजी नगरसेवक व अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन श्री प्रविण श्रीराम पाटील यांची नुकतीच अमळनेर तालुक्याचे आमदार भूमिपुत्र श्री अनिल भाईदास पाटील यांच्या माध्यमातून ग्रामीण रुग्णालयाच्या अशासकीय सदस्य पदी नियुक्ती झाली आहे. प्रवीण पाटील यांना सुरुवातीपासूनच समाजकार्याची आवड आहे गावातील व तालुक्यातील अनेक रुग्णांच्या अनेक रुग्णांच्या अडीअडचणी ते आतापर्यंत सोडवत आलेले आहेत .जळगाव ,धुळे ,नाशिक, मुंबई ,पुणे इतकेच नव्हे तर परराज्यात सुरत येथे सुद्धा त्यांची रुग्णसेवा अविरतपणे आजपर्यंत चालू आहे. असाध्य रोगांवर इलाज करण्यासाठी ज्या मोठ्या शहरांमध्ये महागड्या सुविधा उपलब्ध आहेत तेथेसुद्धा प्रवीण पाटील त्यांच्या ओळखीने व डॉक्टरांसोबत असलेले सलोख्याच्या संबंधामुळे रुग्णांचे काम सोपे करतात. अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक प्रवीण पाटील यांना आशीर्वाद देतात आणि याच आशीर्वादाच्या बळावर मी माझे काम अतिशय जोमाने करतो अशी प्रतिक्रिया प्रवीण पाटील यांनी दिली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button