Pune

?Big Breaking..स्मार्ट सिटीच्या नावाखाली पुण्यात काय सुरू ? चार किलोमीटरच्या सुशोभीकरणासाठी तब्बल 32 कोटी रुपये खर्च

?स्मार्ट सिटीच्या नावाखाली पुण्यात काय सुरू ? चार किलोमीटरच्या सुशोभीकरणासाठी तब्बल 32 कोटी रुपये खर्च

पुणे : पुण्यातील जंगली महाराज रस्ता आणि फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्याच्या चार किलोमीटरच्या सुशोभिकरणासाठी तब्बल 32 कोटी रुपये खर्च केले आहेत. शिवाय या सुशोभिकरणामुळे मुख्य रस्त्याची रुंदी कमी होऊन वाहतूककोंडीत भरच पडली आहे. स्मार्ट सीटीच्या नावाखाली पुण्यात काय सुरू आहे? असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे.

पुण्यातील एफ सी रस्ता, जे एम रस्त्याच्याकडेला लोकांना बसण्यासाठी सोय करण्यात आली आहे. आकर्षक कमानी, रंगीबेरंगी खांब आणि पुरेशी सावली यामुळे अनेक जण या ठिकाणी तासन् तास बसलेले पाहायला मिळतात. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता अर्थात एफ सी रोड आणि त्याला समांतर असलेल्या जंगली महाराज रस्ता अर्थात जे एम रोडवर अशाप्रकारे सौंदर्यीकरण करण्यात आलं आहे.
मात्र स्मार्ट सिटीच्या नावाखाली करण्यात येणाऱ्या या सुशोभिकरणामुळे मुख्य रस्त्याची रुंदी मात्र कमालीची कमी झाली आहे. त्यामुळे रस्ता वाहनांसाठी आहे की लोकांना बसण्यासाठी असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे. शहरात अनेक उद्यानं असताना रस्त्याची रुंदी कमी करुन लोकांना बसण्यासाठी करण्यात आलेली सोय बुचकळ्यात टाकणारी आहे.

एफ सी रोडच्या दोन आणि जे एम रोडच्या दोन अशा एकूण चार किलोमीटरच्या सुशोभिकरणासाठी तब्बल 32 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. पण या सुशोभिकरणासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या काही झाडांवर मात्र संक्रांत आली आहे. नैसर्गिक सौंदर्य नष्ट करुन कृत्रिम सुशोभिकरण केलं जात असल्याच येथे पहायला मिळत आहे.

स्मार्ट सीटीच्या माध्यमातून पुण्यातील काही निवडक रस्त्यांवर कोट्यावधी रुपये खर्च करण्यात येत आहेत. पण फक्त एफ सी रोड आणि जे एम रोड म्हणजे पुणे आहे का? शहरातील इतर रस्त्यांच्या दुरावस्थेचे काय ? असा प्रश्न पुणेकर विचारत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button