Kolhapur

श्री शाहू हायस्कूल ज्यूनिअर कॉलेज कागल येथे जिल्हा स्तरीय व्हॉलीबॉल निवड चाचणी संपन्न.

श्री शाहू हायस्कूल ज्यूनिअर कॉलेज कागल येथे जिल्हा स्तरीय व्हॉलीबॉल निवड चाचणी संपन्न.

सुभाष भोसले कोल्हापूर

कोल्हापूर : कागल मधील शाहू हायस्कूल ज्यूनिअर कॉलेज क्रिडांगणावर १६ वर्षाखालील मुले, मुली व्हॉलीबॉल निवड चाचणी संपन्न झाली. कार्यक्रमाचे उद्घाटन शाहू हायस्कूल ज्यूनिअर कॉलेजचे प्राचार्य जे.डी.पाटील यांनी केले. यामध्ये सुमारे १२५ खेळाडूंनी सहभाग नोंदवला. प्रास्ताविक व स्वागत क्रिडा शिक्षक महेश शेडबाळे यांनी केले. यावेळी आपल्या मनोगतात महाराष्ट्र व्हॉलीबॉल सचिव बाळासाहेब सुर्यवंशी म्हणाले की, येथे आयोजीत निवड चाचणीमध्ये येणाऱ्या प्रत्येक खेळाडूची निवड होणे शक्य नाही पण तुम्हाला खेळामुळे चांगले संस्कार व आरोग्य मिळेल व आपण आपल्या व्याधी पासून मुक्त रहाल.यावेळी मारूती काशीद, विलास कालेकर,मनोरमा पाटील, रुपाली जाधव उपस्थित होत्या. सुत्रसंचालन प्रविण मोरबाळे तर आभार वैभव आडके यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button