मेंढपाळावर होणारे हल्ले तात्काळ थांबवा व चराईत क्षेत्र उपलब्ध करुन द्या – चेतन देवरे
रजनीकांत पाटील
अमळनेर – धनगर समाजातील मेंढपाळ बांधव आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी आपली मेढरे घेऊन महाराष्ट्रभर फिरत असतात. पण ह्याच मेंढपाळ बांधवावर रोज कुठे न कुठे हल्ले होत आहेत. पण शासन याबाबत कुठल्याही प्रकारे दखल घेत नाही. धनगर समाजावरील हल्लेहल्ले तत्काळ न रोखल्यास धनगर समाज रस्त्यावर उतरले असा इशारा आहिल्या क्रांती सेवा संघ चे संस्थापक अध्यक्ष चेतन देवरे यांनी दिला आहे.
याबाबत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईमेल द्वारे निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र फिरणाऱ्या मेढपाळ बांधवावर रोज मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत.तरी राज्यतील धनगर समाजातील मेंढपाळ बांधवावर होणारे हल्ले तत्काळ रोखावे. व मेंढपाळवर हल्ले करणाऱ्या गुंडावर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच शासनाने मेंढपाळ बांधवांसाठी चराईत क्षेत्र उपलब्ध करून द्यावे जेने करुन मेंढपाळ बांधवांनवर होणारे हल्ले व त्याची भंटकती कमी होयील. अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कडे ईमेल द्वारे करण्यात आली आहे.
तसेच अहिल्या क्रांती सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष चेतन देवरे यांनी म्हटले आहे की आम्ही शासनाकडे अनेक वेळा मेढपांळ बांधवान साठी चराई क्षेत्र उपल्ब्ध करुन द्यावे अशी मागणी अनेक वेळा केली होती पण शासनाने ह्या गोष्टी कडे दुर्लक्ष केले आहे.
मेंढपाळावरील हल्ले न थांबल्यास व धनगर समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आगामी काळात धनगर समाज सरकारच्या विरोधात रस्यांवर उतरुन तिव्र आंदोलन करेल असा इशारा ही ह्या ईमेलद्वारे करण्यात आला आहे.






