Baramati

मेखळी – जागतिक आदिवासी दिनानिमित्त

मेखळी – जागतिक आदिवासी दिनानिमित्त

बारामती : मेखळी(जांभळीफाटा)येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राजेंद्र माने व प्रमुख पाहुणे वैभव काळे ह्यांच्या हस्ते आदिवासी शूरवीरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
आदिवासी पारधी समाज्यातील सुशिक्षित तरुणांनी सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रामध्ये वर्चस्व निर्माण करण्याची आवश्यकता आहे. असे मनोगत आदिवासी पारधी परिवर्तन परिषदेचे राज्य समन्वयक श्री.आनंद काळे(सर) यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री.वैभव काळे राज्य समन्वयक यांनी आदिवासी पारधी समाज्याला आवाहन केली की,समाज्यातील सुशिक्षित तरुणांनी यूपीएससी व एमपीएससी परीक्षेत नाव उज्जवल करून करून समाज्याची मान उंचावावी असे मत व्यक्त केले.
आदिवासी पारधी समाज्याला शासनाने योग्य दिशा देण्याऐवजी,समाज्याची दशा केली.आदिवासी पारधी समाज्याला मुख्य प्रवाहात आणून समाज्याला योग्य न्याय दिला पाहिजे असे मत राज्य समन्वयक बापूराव काळे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.राजेंद्र माने ह्यांच्या हस्ते आदिवासी पारधी समाज्यातील सुशिक्षित मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर काळे,सचिन काळे,सौ.अश्विनी भोसले,सौ.सविता भोसले,आकाश भोसले,अमोल काळे,अमोल भोसले,सूरज काळे,महेंद्र काळे आदी.मान्यवरानी सहकार्य केले.

संबंधित लेख

Back to top button