Amalner

‘दर्याची लेकरं’ या पारंपारिक कोळीगीतांच्या बहारदार कार्यक्रमाने समारोप

‘दर्याची लेकरं’ या पारंपारिक कोळीगीतांच्या बहारदार कार्यक्रमाने समारोप

अमळनेर( )येथील विभागीय खान्देशी बोली मराठी साहित्य संमेलनात ‘दर्याची लेकरं’ या पारंपारिक कोळीगीतांच्या बहारदार कार्यक्रमाने उपस्थित प्रेक्षकांना ठेका धरायला लावला तर संमेलनाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करणाऱ्या मान्यवरांच्या भव्य सत्कार सभारंभाने समारोप खान्देशी बोली साहित्य संमेलनाचा करण्यात आला.
समारोप सभारंभाच्या अध्यक्ष ग.स.बँकेचे उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे,यांनी ‘खान्देशी बोली मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनातून पू. सानेगुरुजी ग्रंथालयाचा प्रगतीचा आलेख उंचावला आहे .साहित्य संमेलन आयोजनाच्या अनुभवातून संस्थेची भरभराट होत राहील!’ अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रमुख पाहुणे म्हणून अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील,डॉ.अविनाश जोशी,कवी रमेश पवार,ऍड मनोहर भांडारकर,सौ.वसुंधरा लांडगे, प्रल्हाद बाविस्कर, सौ विजया बाविस्कर, स्वागताध्यक्ष दिलीप सोनवणे,सचिव प्रकाश वाघ आदी प्रमुख मान्यवर मंचावर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ अविनाश जोशी यांनी ‘संमेलनाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेणाऱ्यांच्या प्रयत्नांना प्रेक्षकांनी भरघोस उपस्थितीने प्रतिसाद दिले पाहिजे !’अशी अपेक्षा व्यक्त केली. सौ.वसुंधरा लांडगे यांनी खान्देशी बोली मराठी साहित्य संमेलन नव्या साहित्यिक वर्गाला प्रोत्साहन
देणारे ठरल्याने खऱ्या अर्थाने यशस्वी झाले आहे असे मत मांडले.
मान्यवरांचा सत्कार
याप्रसंगी अमळनेर पत्रकार संघाचा करण्यात आलेला गौरव चंद्रकांत पाटील,ईश्वर महाजन,संजय सूर्यवंशी,पत्रकार मित्र रणजित शिंदे यांनी स्विकारला. संमेलनाचे आयोजन ते यशस्वी करण्यात मोलाचे सहकार्य करणारे मा संचालक नगिनचंद लोढा,विजया गायकवाड,रणजित शिंदे,प्रा डॉ शैलजा माहेश्वरी,गोकुळ बागुल,दिनेश नाईक,धनंजय सूर्यवंशी,जितेंद्र सोनावणे,प्रा लीलाधर पाटील,प्रा डॉ प्रभाकर जोशी,ऍड तिलोत्तमा पाटील,सौ कांचन शहा,विकास ब्राह्मणकर,शैलेश काळकर, विजयसिंग पवार,सोमनाथ ब्रह्मे,रुपाली पवार,अपेक्षा पवार,संजय पवार,प्रकाश धर्माधिकारी,डॉ. राजेंद्र पिंगळे,प्रेस फोटोग्राफर महेंद्र पाटील,हेमंत भांडारकर,निलेश वाघ,सतिष कागणे, सोनाली पवार ,विजय पाटील,नितीन भदाणे आदींचा सत्कार याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

‘दर्याची लेकरं’बहारदार कोळीगीतांनी आणली धमाल

‘डोल डोलतय वाऱ्यावर’,’मी बाई कोळी’,’नाकवा जाऊ कसा लाटांचा मारा, कोळी वाल्या दादा,दर्याच्या पाण्या आलं तुफान, पोप्लेट वाली, अश्या अनेक कोळीगीतांचा खजाना प्रेक्षकांसमोर उघडणाऱ्या ‘दर्याची लेकरं”हा लोकसांस्कृतिक कोळी गीतांचा कार्यक्रम सादर करणारे मुंबई येथील कलाकार चिंतामण शिवडीकर,विलास वरळीकर,वसुधा वरळीकर,प्रमिला वरळीकर,रुपेश मुरुडकर,संदेश मुरुडकर,शशांक प्रभू, विनायक माहे यांचाही गौरव मान्यवरांच्या हस्ते याप्रसंगी करण्यात आला.
समारोप संभारंभास मंचावर पू साने गुरुजी ग्रंथालयाचे उपाध्यक्षा सौ माधुरी भांडारकर, चंद्रकांत नगावकर ,पी एन भादलीकर, भीमराव जाधव,ऍड रामकृष्ण उपासनी, निलेश पाटील,दिपक वाल्हे,प्रसाद जोशी आदि संचालक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी सिमा धाडकर,सुरेश जोशी,रमेश सोनार, बाळापूरे आदिंनी परिश्रम घेतले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button