Faijpur

फैजपुरातील रमाबाई उद्यानात घाणीचे साम्राज्य नगरपरिषदेत नगरसेवकांसह नागरिकांचे निवेदन

फैजपुरातील रमाबाई उद्यानात घाणीचे साम्राज्य नगरपरिषदेत नगरसेवकांसह नागरिकांचे निवेदन

सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

फैजपूर : येथील गेल्या काही दिवसांपासून शिवकॉलनी परिसरातील नागरिकत्यांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत असून नगरपरिषदेने या समस्यांकडे त्वरित लक्ष द्यावे असे निवेदन शिवकॉलनीतील पदाधिकाऱ्यांनी दिले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की शिवकॉलनीतील सार्वजनिक उद्यानातील होणार्या गैरसोयीमुळे उद्यानात घाणीचे साम्राज्य पसरले असून परिसरातील नागरिकांना डास मच्छर यांचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे पालिकेने रमाबाई उद्यानातील गैरसोयी त्वरित दुरुस्त करून द्यावे आणि दररोज साफसफाई सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे फैजपुर नगरपरिषद मुख्याधिकारी .किशोर चव्हाण साहेब यांना निवेदन देण्यात आले निवेदन देतांना .देवेंद्र साळी (नगरसेवक ).अशोक भालेराव साहेब रा.काँ.पा (सा.न्या.वि)फैजपुर शहर अध्यक्ष ,लखन इंगळे,विक्की भाऊ घावरे,सुपडू खंडाळे इ उपस्थित होते*
*विषय-शिवकॉलनी येथील माता रमाबाई आंबेडकर उद्यानाला लागून गटार पूर्ण पने तुटलेली असून गटाराचे पाणी घराच्या पय्यामध्ये जात आहे तरी ही गटर दुरुस्त करणे व रमाबाई उद्यानाची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून ठीकठिकाणी खड्डे पडलेले आहे, उद्यानाला कलर नाही, पाण्याची टाकी नाही, झाडांना पाणी द्यायला नळी नाही या सर्व सोयी करण्यात याव्यात आणि उद्यानांमध्ये फेवर ब्लॉक बसवण्यात यावे*अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button