Pune

११ एकर क्षेत्रात ३९० टन केळीचे उत्पादन..

११ एकर क्षेत्रात ३९० टन केळीचे उत्पादन..

दत्ता पारेकर पुणे

पुणे : इंदापूर तालुक्यातील वडापुरी गावचे धोंडीराम शंकर काटकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी नर्मदा काटकर हे वडापुरी चे उत्तरेच्या दिशेला राहत असून. मुळातच अर्धा एकर जमीन असलेले हे कुटुंब शेतीसह काबाड कष्ट करून मुलांना उच्चशिक्षित केले. ही मुले म्हणजे ज्ञानेश्वर काटकर, हरिदास काटकर व भागवत काटकर आहेत. त्यांनी त्यांच्या शिक्षण आणि व्यवसाय याद्वारे आपल्या असलेल्या कला कौशल्याच्या आधारावर उत्तम असे व्यवसाय चालू केले. जिद्द चिकाटी व मेहनतीने प्रतिकूल परिस्थितीमध्ये जो आपल्या प्रयत्नातून यश निर्माण करतो तोच शेतकरी पुत्र या युक्ती प्रमाणे या तिन्ही बंधूंनी शेती कंट्रक्शन आणि फेब्रिकेशन या व्यवसायाच्या जोरावर उत्तम अशी प्रगती करीत राहिले. अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून त्यांनी एक एक रुपया ची किंमत केली .आणि शेती क्षेत्राची आवड असल्याने या बंधूंनी वडिलोपार्जित अर्धा एकर जमीन असताना या काटकर बंधूंनी एकाच ठिकाणी ४० एकर क्षेत्र दहा ते पंधरा वर्षाच्या काळात घेऊन एक आदर्श शेतकरी ठरले.

त्यांनी आज तीन वर्ष झाली. भीमा नदी वरून चक्क ११ किलोमीटर लांब असलेली आठ इंच आकारमानाची पाण्याची पाईप लाईन वडापुरी येथील क्षेत्रामध्ये आणली व त्यातून ओसाड असलेल्या शेतीचे रूपांतर ८ विहिरीसह बागायतीशेतीमध्ये केले .

असेच त्यांनी गेली दोन वर्षापासून अकरा एकर क्षेत्रामध्ये ११० ट्रेलर शेनखत टाकून १६ हजारG9 या जातीचे केळी रोपांची लागवड केली असून त्यास पूर्णपणे ड्रीप केली .या ड्रीप च्या माध्यमातून दररोज लागवडी कालापासून ते केळीला फुले लागण्यापर्यंत दोन तास पाणी दिले. त्याच बरोबर रासायनिक खते ही ड्रिप च्या माध्यमातून वेळोवेळी दिले गेली. सर्वसाधारण केळीचे पिक १० ते ११ महिन्यांमध्ये पूर्णत्वास येते. ज्या वेळी फुले लागतात त्या वेळापासून किमान पाच तास पाणी ड्रीप मार्फत दर दिवसाला त्यांनी दिले व आठ दिवसाच्या फरका मध्ये रासायनिक खत वेळोवेळी दिले. यातून प्रती झाडास सरासरी २५ किलोचा केळीचा घड लागला. यामध्ये काही झाडांना ३०, ३५ ते ४० किलोचे गड लागलेले दिसून आले. अशा पद्धतीने काटकर बंधूंनी एकरी ३५ ते ४० टन उत्पन्न अकरा एकर मध्ये ३९० टन केळीचे उत्पादन घेतले. सदर काटकर फर्मचे प्रगतशील शेतकरी भागवत काटकर व रोहित काटकर यांनी केळी विषयी सर्व सविस्तर माहिती दिली.

काटकर बंधूंनी इतर पिकांबरोबर केळी पिकातून अतिशय चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेऊन शेतकऱ्यांपुढे कठीण परिस्थितीमध्ये आदर्श शेतीचे उत्तम उदाहरण तयार केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button