महाराष्ट्र राज्य जुनी हक्क पेन्शन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांची भेट.
सुभाष भोसले-कोल्हापूर
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने आज DCPS योजनेचे NPS मध्ये रूपांतर करण्यास विरोध दर्शवणे बाबतचे निवेदन विशाल सोळंकी आयुक्त (शिक्षण) पुणे तसेच शिक्षण संचालक प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना देण्यात आले.
डीसीपीएस धारकांच्या सातव्या वेतन आयोगातील फरक लवकरात लवकर आदा करावा या संदर्भाने चर्चा केली साहेबांनी सकारात्मकता दर्शवून लवकरात लवकर कार्यवाही बाबतच्या सूचना करण्यात येतील असे आश्वासन दिले.
तसेच केंद्रप्रमुख सरळ सेवा व विभागीय परीक्षेसाठी जिल्हा परिषदेच्या सर्व प्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांना पात्र ठरविण्याबाबत सुधारित कार्यपद्धती निश्चित करावी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करावी तसेच वस्तीशाळा शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मिळावी यासाठी सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले.
यावेळी विश्वस्थ प्रवीण पाताडे , संदीप पाडळकर, अशोक सोळुंके, मंगेश धनवडे, शहाजी गोरवे , अरविंद पुलगुर्ले उपस्थित होते.






