Chandwad

सावधान!चांदवड शहरातील मुख्य रस्ते काही परिसर अंधारात राहण्याची शक्यता

सावधान!चांदवड शहरातील मुख्य रस्ते काही परिसर अंधारात राहण्याची शक्यता

उदय वायकोळे चांदवड

चांदवड शहरात EESL तर्फे मुख्य चौक तसेच अनेक मुख्य रस्ते व गजबजलेल्या ठिकाणी लावण्यात आलेले हायमास्क लाईट व इतर काही लाईट कंपनीची माणसे काढून नेत असल्याचे चित्र कालपासून चांदवड शहरात दिसत आहे.याबाबत अधिक माहिती घेतली असता समजते की EESL कडून चांदवड शहरात अंदाजे 300 च्या आसपास लाईट गेल्या 3 वर्षात बसविण्यात आले आहेत त्याचा पूर्णत्वाचा दाखला अजूनही चांदवड नगरपरिषदेने दिलेला नसल्याने कंपनी ने संबंधित ठेकेदारास ते लाईट काढून आणण्यास सांगितले असल्याने सदरील लाईट विविध ठिकाणाहून काढून घेत असल्याचे समजते.
अंधाराचा फायदा घेऊन शहरात चोऱ्या होऊ शकतात तसेच इतरही प्रकार वाढू शकतात.नगरपरिषदेने या प्रकारात गांभीर्य लक्षात घेऊन योग्य ती उपाययोजना करणे आवश्यक आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button