कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचा वांदा
दिलीप वाघमारे
लोणंद शहरातील महाराष्ट्रातील दोन नंबरची बाजारपेठ म्हणून लोणंद शहराची ओळख होती डिसेंबर महिन्यापासून सव्वाशे रुपये किलो झालेला कांदा आज ते 23 रुपये किलो निघाले त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त.

लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जवळपास तीन जिल्ह्यांमधून कांद्याचे आवक वाढल्याने अखेर दर कोसळले आहेत शासनाने बाहेरचा कांदा मागवल्या मुळे सध्याचे भाव पडलेले आहेत आणि शासनाने निर्यात चालू करावी यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत तरच पुन्हा दरवाढ अटळ आहे असे प्रतिपादन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री राजेंद्र तांबे यांनी प्रतिनिधी जवळ बोलताना व्यक्त केले याप्रसंगी उपसभापती दत्तात्रेय बिचुकले सचिव विठ्ठल सपकाळ संचालक रासकर एन डी शिरसागर सर्व संचालक वर्ग व्यापारी शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते






