Pune

एक गुन्हा तुमचे जीवन उध्वस्त करू शकतो – DySP नारायण शिरगावकर

एक गुन्हा तुमचे जीवन उध्वस्त करू शकतो – DySP नारायण शिरगावकर

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

ऑनलाइन माहिती तंत्रज्ञानाचा योग्य वापर होणे गरजेचे असल्याने आपण केलेल्या चुकीच्या वर्तणुकीमुळे आपले आर्थिक नुकसान होऊ शकते. आपली बदनामी होऊ शकते. फेसबुकवर फोटो अपडेट करणे, कमेंट्स, प्रोफाइल, गेम, ओटीपी, एटीएम, यासारख्या तंत्रज्ञानाच्या गोष्टी योग्य आत्मसात करून त्याचा गैरवापर होणार नाही यासाठी दक्षता घेणे आवश्यक आहे. मोफत मिळेल ते नक्कीच धोकादायक असते.

गुन्हा किती शिल्लक आहे हे पाहिले जात नाही. गुन्हा दाखल झाल्यामुळे भविष्यात आपल्याला अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे एक गुन्हा तुमचे आयुष्य उधवस्त करू शकतो असे मत बारामती पोलीस उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांनी इंदापूर येथे बोलताना व्यक्त केले.

इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सायबर क्राईम आणि सेक्युरिटी’ या विषयावर बोलताना नारायण शिरगावकर बोलत होते.
यावेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश लोकरे, नायब तहसीलदार रविकांत बनसोड, उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे, शुभांगी खंडागळे, सुनिता माने, माधुरी लडकत उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांची ओळख करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तानाजी कसबे यांनी केले. आभार डॉ. शिवाजी वीर यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button