Amalner

?️ झाडाला दिवा लावा कोरोना पळवा.महिलांमध्ये वाढत आहे अंधश्रद्धा

?️ झाडाला दिवा लावा कोरोना पळवा…महिलांमध्ये वाढत आहे अंधश्रद्धा

प्रा जयश्री दाभाडे

अमळनेर येथील वाणी मंगल कार्यालय जवळ पवन चौकात निंबा च्या झाडा खाली विविध प्रकारचे दिवे लावलेले आढळून आले. सध्या संपूर्ण देशात कोरोना ची धाम धूम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अनेक उपाय योजना राबविण्यात येत आहेत. महाराष्ट्र शासनाने संचार बंदी लागू केली असून ठीक ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

?️ झाडाला दिवा लावा कोरोना पळवा.महिलांमध्ये वाढत आहे अंधश्रद्धा

आता यावर कळस म्हणजे महिलांनी कडू निंबा च्या झाडा खाली दिवे लावले आहेत आणि कोरोना विषाणू यामुळे जातो अशी अंधश्रद्धा निर्माण झाली आहे. अमळनेर शहरात तीन ते चार ठिकाणी अश्या पद्धतीने निंबा च्या झाडा खाली दिवे लावलेले आढळून आले आहेत. आता देव तर काही करू शकले नाहीत कोरोना समोर पाहू या निंबा चे झाड आणि दिवे काय दिवे लावतात ते….

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button