Kolhapur

पदवीधर,शिक्षक मतदार संघ नोंदणी करण्यास मुदतवाढ मिळावी -सर्जेराव सुतार

पदवीधर,शिक्षक मतदार संघ नोंदणी करण्यास मुदतवाढ मिळावी -सर्जेराव सुतार

सुभाष भोसले -कोल्हापूर
पुणे विभागाचे विधानपरिषद मतदारसंघामध्ये जुनी मतदार यादी बरखास्त केल्याने नवीन मतदार यादी तयार करण्यासाठी निवडणूक आयोगाने रीतसर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे, यानुसार नोंदणी करण्यासाठी ची अंतिम मुदत 6 नोव्हेंबर आहे, परंतु सध्या शालेय दीपावली सुट्ट्या असल्याने बरेच लोक पर्यटन साठी परगावी गेले असल्याने त्यांना नोंदणी करण्यासाठी अवधी मिळणार नाही, तसेच निवडणूक आयोगाने सुरवातीला वर्तमान पत्रात नोंदणी कार्यक्रम जाहीर करताना त्यामध्ये अर्जासोबत झेरॉक्स प्रती वर स्वयं साक्षांकित करून जमा करता येईल असे नोंद केले होते, पण त्यानंतर झालेल्या निवडणूक निर्णय अधिकारी बैठकीमध्ये असे सांगितले की,झेरॉक्स प्रती या राजपत्रित अधिकारी यांचेकडून साक्षांकित करूनच फॉर्म जमा करावा, यामुळे फॉर्म जमा करण्यासाठी गेलेल्या अनेक पदवीधराना विना फॉर्म भरताच घरी परतावे लागले त्यामुळे विनाकारण नाहक त्रास होत असल्याचे अनेकांनी सांगितले,
म्हणून च या तक्रारीं लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने 1 नोव्हेंबर रोजी निवासी उपजिल्हाधिकारी श्री गलांडे यांना संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सर्जेराव सुतार यांच्या नेतृत्वाखाली लेखी निवेदन देऊन मतदार नोंदणी करण्यासाठी15 दिवसांची आणखीन मुदतवाढ मिळावी आणि झेरॉक्स प्रती स्वयं साक्षांकित केलेल्या स्वीकाराव्यात याबाबत चर्चा केली. यावेळी संघटनेचे राज्य, जिल्हा, तालुका पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने पदवीधर उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button