Amalner

निर्भय सोनारचे सुयश वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय

निर्भय सोनारचे सुयश वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय

अमळनेर

२५जानेवारी रोजी चोपडा येथे संपन्न झालेल्या आंतरमहा विद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत अमळनेर प्रताप महाविद्यालयाचा विद्यार्थी निर्भय धनंजय सोनार यास द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. महाविद्यालयीन तरुणांवर मोबाईल फोनचे होणारे दुष्परिणाम या विषयावर निर्भयने आपली भूमिका मांडली.
भगिनी मंडळ चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालयाने या आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते.
निर्भय यास रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
निर्भय सोनार याचे यशा बद्दल प्राचार्या डॉ ज्योती राणे प्रा डॉ रमेश माने, प्रा.डॉ संदीप नेरकर, प्रा डॉ नितीन पाटील प्रा लीलाधर पाटील, डीगंबर महाले, डॉ जी एम पाटील, प्रा अशोक पवार, सतीश देशमुख, दिलीप सोनवणे, प्रा पी टी धर्माधिकारी, इंद्रवदन सोनवणे, प्रा पराग पाटील, प्रा एस ओ माळी, प्रा भावसार, सचिन खंडारे,पत्रकार संजय सोनार, संजय कृष्णा पाटील, चंदू काटे, राजेश पोतदार, चेतन राजपूत, चंद्रकांत पाटील, भटू वाणी, जितू ठाकूर, प्रा. जयश्री साळुंके, ईश्वर महाजन, किरण पाटील, गणेश खरोटे, रविंद्र विसपुते, श्याम सोनार, महेश निकुंभ, विशाल विसपुते, सुमित विसपुते, शहर,तालुका व ग्रामीण पत्रकार संघ, सुवर्णकार समाज, पुरोगामी मित्र परिवार यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस सदिच्छा दिल्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button