रावेर

रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे सरकार चा जाहीर निषेध. ..

रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे  सरकार चा जाहीर निषेध. ..

रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे सरकार चा जाहीर निषेध. ..

रावेर प्रतिनिधी विलास ताठे
मा.खा.शरद पवार माजी केंद्रीय कृषिमंत्री मंत्री हे  वयाच्या ८०व्या वर्षी ही सगळे सहकारी सोडून जात असताना, न डगमगता संपूर्ण राज्यभर दौरे काढत  जनतेत जाऊन मिसळत असतानाच त्यांच्या सारख्या महाराष्ट्राच्या या बुजुर्ग नेत्यांला राजकीय आकसापोटी *ईडी*  बाबत काही कारवाई करीत असेल तर ते नक्कीच कुठल्याही निकोप लोकशाहीला मान्य नसणार आहे.महाराष्ट्रा सारख्या राजकीय सुसंस्कृत राज्यात अशा खुन्नसी प्रकारा विरोधात संपूर्ण राज्यभर चीड व्यक्त केली जात असतानाच आज रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने  ही श्री.शरद पवार साहेबांवरील वयाच्या ह्या टप्प्यावर सूडबुद्धीने होणाऱ्या ह्या कारवाईचा निषेध नोंदवून रावेर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. 
याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष किसान सभेचे सोपन पाटील, रावेर राष्ट्रवादी 
 तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी,
माजी नगराध्यक्ष गोटू शेठ, माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, माजी जिलहा परीषदेचे सदस्य रमेश पाटील, पंचायत समितीचे सदस्य योगेश पाटील, दिपक पाटील, 
कार्याध्यक्ष राष्ट्रवादी रावेर विलास ताठे, रावेर युवक अध्यक्ष , सचिन पाटील, उपाध्यक्ष रावेर राष्ट्रवादी काँग्रेसचे 
विनोद चौधरी, विनोद नथथु चौधरी,शे. अस्लम  सलीम भाई लक्ष्मण मोपारी. प्रशांत पाटील, घनश्याम पाटील, गणेश चौधरी, जिजाबराव पाटील, सह अनेक प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button