Amalner

? Big Breaking..पाडळसरेच्या निधीसाठी बैठक अन् भूमिपुत्र आमदारच बेखबर! आपला लोकप्रतिनिधी मतदारसंघाच्या प्रश्नांसदर्भात किती सजग, दरबारी काय पत याचीही आली प्रचिती

पाडळसरेच्या निधीसाठी बैठक अन् भूमिपुत्र आमदारच बेखबर!
आपला लोकप्रतिनिधी मतदारसंघाच्या प्रश्नांसदर्भात किती सजग, दरबारी काय पत याचीही आली प्रचिती

अमळनेर : निम्न तापी प्रकल्प, पाडळसे योजनेसाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी आज जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या दालनात बैठकीचे आयोजन होते. मात्र, ज्या पाडळसेवर राजकारण करून आमदारकी मिळवली तो भूमिपुत्र आमदारच या बैठकीपासून बेखबर अशी वास्तवता. विशेष म्हणजे जलसंपदा मंत्री हे राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे असून भूमिपुत्र आमदार खान्देशातून एकमेव राष्ट्रवादीकडून निवडून आलेले आहेत व हा प्रकल्प त्यांच्या अमळनेर मतदारसंघातील आहे. दरम्यान आपला लोकप्रतिनिधी मतदारसंघाच्या जिव्हाळ्यांच्या प्रश्नांसदर्भात किती सजग आहे व त्याची दरबारी काय पत आहे याची प्रचिती समस्त अमळनेर मतदारसंघाला यानिमित्ताने आली आहे.

भूमिपुत्र आमदार अनिल भाईदास पाटील यांनी शाश्वत पाडळसे प्रकल्पासाठी नव्या सरकारच्या पहिल्यावहिल्या हिवाळी अधिवेशनातही निधी मागितला नव्हता. पाडळसे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून गेल्या 25 वर्षांपासून केवळ त्यावरून राजकारण होत आहे. पाडळसे प्रकल्प पूर्णत्वास आल्याशिवाय येथील शेतकर्‍यांचा सर्वांगीण विकास होणार नाही हे शाश्वत सत्य आहे. यावरून स्वंयघोषित भूमिपुत्राला शेतकरी आणि शेतीविशयी किती कळवळा आहे, किती दांडगा अभ्यास, व्यासंग आहे तो येथील प्रश्नांसाठी किती सजग आहे याचाही प्रत्यय येतो.
हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीत तापी पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत प्रकल्पांना भरघोस निधीचे प्रावधान करण्यात आले होते. यात शेळगाव, वरखेड लोंढे, सुलवाडे-जामफळ कनोली या प्रकल्पांचा समावेश होता व त्यांना भरघोस असा निधी जलसंपदा विभागाने दिला. यापैकी काही प्रकल्प हे बीजेएसवाय तर काही पीएमकेएसवाय अंतर्गत अंतर्भुत आहेत. मात्र, उर्वरित महाराष्ट्रातील लेंडी, शिवना, ब्रह्मगव्हाळ, कृष्णा भीमा, भातसा असे कितीतरी प्रकल्प जे कोणत्याच योजनेत अंतर्भुत नाही अशा प्रकल्पांसुद्धा निधी देण्यात आला. यामागील कारण म्हणजे तेथील काही नवख्या आणि अनुभवी लोकप्रतिनिधींनी सक्षम पाठपुरावा व मागणी लावून धरली. त्यामुळे अमळनेर विधानसभा मतदारसंघाच्या नवख्या आमदाराने आजी माजी आमदारांचे मार्गदर्शन घेत पाडळसेसाठी विविध पद्धतीने निधी कसा पदरात पाडून घेता येईल याकडे लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता आहे.

आमदार अनिल पाटील यांनी भलत्यात पडण्यापेक्षा पाडळसे हेच आपले लक्ष ठरवत त्या दिशेने भक्कम पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे. पाडळसे हा विषय माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील कोडून प्यालेले आहेत. त्यांना खडान्खडा माहिती आहे. निधीसाठी कोणाचे नाक दाबायचे म्हणजे तोंड उघडेल हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. यासह माजी आमदार शिरीष चौधरी यांनीही त्यांच्या टर्म मध्ये भरघोस निधी या प्रकल्पासाठी आणला आहे. आजी आणि माजी आमदारांचा मतदारसंघाचा विकास हाच ध्यास आहे. त्यामुळे या माजी आमदारांचे मार्गदर्शन घेण्यास विद्यमान आमदारांना काहीएक हरकत नसावी.

निम्न तापी प्रकल्प, पाडळसे योजनेसाठी निधी उपलब्ध व्हावा, जिल्ह्यातील निम्न तापी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणार्‍या तापी नदीवरील भोकर येथे मोठ्या पुलाचे बांधकाम करणे, जिल्ह्यातील पद्मालय-2 उपसा सिंचन योजनेसाठी निधी या विषयांवर चर्चा करण्यासाठी राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांच्या मुंबई येथील दालनात आज बैठक होती. याबैठकीसाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, चोपडा मतदारसंघाच्या आमदार लता सोनवणे व संबंधित विभागांचे प्रमुख हे विशेष निमंत्रित होते.

तरी देखील आपले भूमिपुत्र आमदारला आमंत्रण का देण्यात आले नाही? तालुक्याचा जिव्हाळ्याचा विषय असलेला पाडळसरे निधीच्या अत्यन्त महत्वाच्या बैठकीला तालुक्याच्या आमदाराला डावलण्यात येते! यावरून भूमिपुत्रांना सरकार दरबारी किती महत्व आहे याची कल्पना येऊ शकते. असली काही बैठक होणार आहे याची साधी खबरही तेथील आमदाराला असू नये हे आपल्या सर्वांचे दुर्दैव दुसरे काय.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button