Aurangabad

बसच्या धडकेत मोटरसायकलवरील युवक गंभीर जखमी… अंबड रोडवरील मठपिंपळगाव फाट्यावरील घटना…

बसच्या धडकेत मोटरसायकलवरील युवक गंभीर जखमी… अंबड रोडवरील मठपिंपळगाव फाट्यावरील घटना…

विकी खोकरे अंबड

अंबड : सालदार वडिलांसाठी किराणा सामान घेऊन मोटरसायकलवर जात असताना अंबड कडुन जालन्याच्या दिशेने जाणार्‍या भरधाव बसने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात युवक गंभीर जखमी झाला असून त्याचे नाव संदिप (संजय) अरुण शिंदे (वय १७ वर्षे) रा.इंदेवाडी ता.जालना असे आहे.सकाळी साडेनऊच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली.या विषयी अधिक माहिती अशी की, काही सामान घेऊन अंबडच्या दिशेने शेताकडे सदर युवक निघाला असता त्यास अंबड कडुन जालन्याच्या दिशेने जाणार्‍या बीड अकोला या बसने(एम. एच ४० ए.क्यु – ६१३४) ने जोराची धडक दिल्याने मोटर सायकल (एम २१ ए – ७२५८) वरील संजय शिंदे यांच्या डोक्याला व पायाला गंभीर इजा झाल्याने तो जागेवरच बेशुद्ध पडला. बस चालक तेथून फरार झाला.गंभीर जखमी युवकास तात्काळ मठपिंपळगाव येथील जगदीश जिगे ,संदिप डावखर यांनी ग्रामस्थांच्या मदतीने गाडीत टाकून प्रथम जालना येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले परंतु तब्येत सिरीयस असल्याने नंतर खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.अपघातनंतर रस्तावर बघ्याची मोठी गर्दी झाली होती.पोलिस या बाबत कळविण्यात आले होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button