Dharangaw

बाभूळगाव येथे अखंड हरीनाम किर्तन सप्ताह ला सुरुवात

बाभूळगाव येथे अखंड हरीनाम किर्तन सप्ताह ला सुरुवात

कमलेश पाटील धरणगाव प्रतिनिधी

बाभूळगाव ता.धरणगाव सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती | रखुमाईच्या पती सोयरिया ||गोड तुझे रूप गोड तुझे नाम |देई मज प्रेम सर्व काळ || पांडुरंगाच्या कृपेने व साधू संताच्या आशीर्वादाने पावन झालेल्या बाभूळगाव नगरीत दरवर्षी श्री संत माणिक बाबा महाराज व श्री संत दौलत बाबा महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरीनाम किर्तन सप्ताह चे आयोजन केले जाते या ही वर्षी मोठ्या उत्सहात ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि तरुणांच्या उपस्थितीने व श्री ह.भ.प दिलीपजी महाराज पवार बिडकर यांच्या मार्गदर्शनाने चालत असलेला अखंड हरीनाम किर्तन सप्ताह वर्ष १३ वे दिनांक ०७/०१/२०२३ ते १४/०१/२०२३ पर्यंत या सात दिवसाच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे तसेच १३/०१/२०२३ वार शुक्रवार रोजी श्रीची पालखी सोहळा आयोजित केला आहे व दैनंदिन कार्यक्रम सकाळी ५ ते ६ काकडा आरती आणि संध्याकाळी ५ ते ६ हरिपाठ व रात्री ८.३० ते १०.३० वारकरी शिक्षण संस्था आळंदी येथील नामवंत कीर्तनकारांचे किर्तन व शेवटच्या दिवशी दिनांक १४/०१/२०२३ रोजी काल्याच्या कीर्तनाने अखंड हरीनाम किर्तन सप्ताहाची सांगता होऊन नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button