भुदरगड तालुक्यातील भाजप चे जिल्हा उपाध्यक्ष नाथाजी पाटील झाले कोल्हापूर जिल्हा ग्रामीण संघटनमंत्री
सुभाष भोसले कोल्हापूर
कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील भाजप चे जिल्हा उपाध्यक्ष नाथाजी पाटील यांची कोल्हापूर जिल्हा ग्रामीण संघटनमंत्री म्हणून निवड करण्यात आली .
भारतीय जनता पार्टी भुदरगड ,राधानगरी,आजरा तालुक्यातील वाढवण्याचे त्यांनी निष्ठेने काम केले आहे.भाजप प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांचे ते जवळचे कार्यकर्ते आहेत. या निवडीसाठी त्यांना भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर ,भाजप प्रदेश प्रवक्ते माजी खासदार धनंजय महाडिक यांचे सहकार्य लाभले .या निवडीचे पत्र कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजे समरजित घाटगे यांनी दिले .या निवडीचे भुदरगड तालुक्यात त्यांच्या समर्थकांच्या उत्साहाचे वातावरण पसरले आहे.






