Maharashtra

?️अमळनेर कट्टा… लॉक डाऊन मा मच्छी लेरे भो..!झिंगा ले..पापलेट ले..राऊ ले..!कोंबडा..लेस कारे भाऊ..!पूर्णतः लॉक डाऊन मध्ये कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे मच्छी मार्केट..!राजकीय सुरमई  की अधिकाऱ्यांचा कोंबडा…!

अमळनेर येथे उपविभागीय अधिकारी यांनी जाहीर केल्या प्रमाणे दि 27 मार्च ते 29 मार्च लॉक डाऊन असून जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार दि 30 मार्च पर्यंत जिल्हा बंद आहे.यामुळे अमळनेर एकूण 4 दिवस बंद राहणार आहे. या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरातील सर्व दुकाने अत्यावश्यक सेवा वगळता बंद आहेत.पण याला अपवाद आहे मच्छी मार्केट..!मागच्या शनिवारी रविवारी देखील लॉक डाऊन काळात हे मच्छी मार्केट बिनधास्तपणे सुरू होते.आता नियम हा सर्वांना सारखा असणे आवश्यक आहे. पण प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांना हे मार्केट सुरू आहे हे दिसत असूनही कार्यवाही का होत नाही. सामान्य लोकांना त्रास देणारे हे प्रशासन नियम सर्वांना सारखे का लावू शकत नाही..? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ह्या सर्व प्रकारामागे नेमका कोणाची सुरमई आणि माया काम करत आहे. असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे.कार्यवाही करावी अन्यथा सर्वांनाच लॉक डाऊन मधून मुक्त करावे अशी मागणी केली जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button