स्वतः रक्तदान करून वर्दीतले दर्दी असल्याचा दिला दाखला,रक्तदात्याना जनजागृतीच्या फ्रेम वाटप
अमळनेर-गेल्या काही दिवसांपासून अमळनेरात दाखल झालेले कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक जयपाल हिरे हे गुन्हेगार, गुन्हेगारी व अवैध धंद्यासाठी कर्दनकाळ ठरल्याने त्यांच्या नावाने गुन्ह्ये क्षेत्रातील मंडळींचा थरकाप उडत आहे,मात्र वर्दीतले हे कडक अधिकारी तेवढेच दर्दी असल्याचा दाखला त्यांनी स्वतः रक्तदान करून दिला आहे.
या माध्यमातून अमळनेर येथील युवा मित्र परिवराच्या माध्यमातून सुरु असलेल्या रक्त चळवळीत ते सामील होत या चळवळीला बळकटी देण्याचा प्रयत्न त्यांनी केला असून जेथे काही चांगले अथवा जनहीताचे कार्य होत असेल त्यास आपले सहकार्यच असेल हे देखील त्यानी दाखवून दिले आहे. अमळनेर नगरीत वाढदिवसाला रक्तदान असा पायंडाच युवकांमध्ये पडला असुन याचे संपूर्ण श्रेय युवा मित्र परिवारालाच जाते,वर्षभर युवा मित्र परिवारकडून समाजपयोगी कार्यक्रमही होत असतात सध्या शाळा बंद असल्याने सामाजिक कार्यकर्ते दिनेश तेवर हे दरवर्षी चारशे ते पाचशे अनाथ मुलांना अन्नदान करत होते,आपण समाजाला काही देणे लागते या उद्देशाने दिनेश तेवर यांनी यावर्षी रक्तदान केले होते,पोलीस निरीक्षक हिरे यांनी रक्तदान केल्या प्रसंगी तेवर यांनी असंख्य युवांना रक्तदान केल्या बद्दल जनजागृती संबंधी फोटो फ्रेम भेट दिल्या.यावेळी दर तिन महिन्यांनी रक्तदान केले पाहीजे रक्तदान केल्याने जिव वाचतो हृदयरोग होण्याचे 30% ते 40% कमी होते कँन्सर होण्याचे प्रमाण कमी होते वजन कमी होते असे मोलाचे मार्गदर्शन पो.नि हिरे यांनी केले,तसेच अमळनेर युवा मित्र परिवाराच्या वतीने पो.नि.हिरे यांना ते दैवत मानत असलेल्या त्यांच्या आईचा फोटो भेट करण्यात आला, यावेळी अनिल महाजन युवराज कुंभार प्रकाश पाटील गोरख चौधरी भावीक भदाणे विशाल चौधरी भरत पाटील रुषीकेश शिंगाणे दीपक प्रजापती अशा असंख्य युवांनी देखील रक्तदान केले तर रक्तदान चळवळीचे प्रमुख मनोज शिंगाणे, योगिराज चव्हाण, दादा सोनार ,अवी चौधरी, शशांक संदानशिव, सिध्दू चौधरी,राहुल कंजर बंटि पाटील ,प्रथमेश भोसले ,नाना पाकळे सुशील पाटील, कुंदन पाटील ,शशीकांत शिंगाणे ,सुरज कंजर बापू पाटील इ. युवा बांधवांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यावेळी मनोज शिंगाणे यांनी चांगल्या अधिकाऱ्यांच्या प्रोत्साहनामुळे युवकांना प्रेरणा मिळते,आमच्या रक्त चळवळीला सगळ्याच स्थरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे, एका शब्दावर रक्तदाते रक्तदानसाठी तयार होतात याचे सगळ श्रेय युवा बांधवांनाच आहे यापुढेही रक्तदान चळवळ अशीच सुरु राहील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.






