Kalwan

नाशिक जिल्ह्यातील अतिदुर्गम सुरगणा तालुक्यातील युवकांनी प्रथमच प्रवास…एका ध्येय वेड्याचा हा लघुपट तयार केला.

नाशिक जिल्ह्यातील अतिदुर्गम सुरगणा तालुक्यातील युवकांनी प्रथमच प्रवास…एका ध्येय वेड्याचा हा लघुपट तयार केला.

विजय कानडे

लघुपटाचे चित्रीकरण बेलबारी माणी, उंबरदे, देवमाळ, मोरडा, भोरमाळ, केळुने, थाविलपाडा या भागात चित्रित केलेला असून या लघुपटाचा ट्रेलर २५ ऑगस्टला SD Rudra production चॅनलच्या you tube वरिल लिंकवर प्रदर्शित झाला.त्यात या लघुपटास पहिल्याच दिवशी उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

अतिदुर्गम अशा आदिवासी भागातील जीवनशैलीचा विचार केला तर आपल्या डोळ्यासमोर लगेच तेथील प्रत्यक्षदर्शी तेथील परिस्थिती उभी राहते.शेतात दिवसभर काबाडकष्ट करून किंवा दुसऱ्याच्या शेतात रोजनदारीने आपली उपजीविका भागवणारे कुटुंब आजतागायत आपण पहातो.परंतू जर आजच्या युवकांचा विचार केला तर आजही आपल्याला या भागातील तरुणपिढी ही शिक्षणाच्या अभावी किशोरवयीन प्रेमाच्या मोहजालात पूर्ण गुरफटून जाते .कुणी आपल्या प्रेमासोबत पळून जाऊन लग्न करतात.तर कुणी एकतर्फी प्रेमासाठी आपली जीवनयात्रा संपवतात .तर कुठे प्रेमवीरांच्या या जीवनाचा सैराट होतो, पण मागे रहाते फक्त अन फक्त दुःखी कष्टी आईवडील व त्यांच्या कुटुंबाची आयुष्यभर होणारी वाताहात. आपल्या सभोवतालच्या असलेल्या या परिस्थितीतुन युवकांना प्रेमाच्या मृगजळातून बाहेर काढण्यासाठी निर्माता संदीप धूम यांच्या सर्व टीमने जो प्रवास या लघुपटात रेखाटला आहे.व त्याच प्रवासातील ध्येय वेड्या शंकर व जोत्स्ना यांनी आपला सुंदर अभिनय करून आजच्या तरुणपिढी च्या डोळ्यात जणू झणझणीत अंजण च घातले आहे.व आपल्या जीवनात कशाला महत्व द्यावे याचे एक सुंदर असे आदर्श उदाहरणच आपल्यासमोर ठेवले आहे.

मुख्यत्वे या लघुचित्रपटात निर्माता/ दिग्दर्शक- संदिप धुम, पटकथा-सतीश बनसोडे कोरिओग्राफी- प्रवीण गावित. एडिटर व कॅमेरामन- भागवत पवार, कमलेश चौधरी यांनी अतिशय मेहनत करून शंकर मीसाळ व ज्योत्स्ना खांबाईत यांनी अतिशय दर्जेदार अशी अभिनयाची अदाकारी करून,

प्रवास…एका ध्येय वेड्याचा…!

हा लघुपट साकार केला आहे. या लघुपटासाठी दर्शन फोटो स्टुडिओ सुरगाणा,तसेच तालुक्यातील समस्त ग्रामस्थ,सरपंच,पोलीस पाटील व इतर मान्यवरांचे विशेष सहकार्य लाभले आहे.आपण सर्वांनी हा लघुपट . YouTube वरती SD Rudra production या चॅनल च्या लिंकवर पहावा.व ग्रामीण भागातील या कलाकृतीस उदंड असा प्रतिसाद द्यावा.हि नम्र विनंती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button